जिल्हाधिका-यांच्या हस्ते वनराई बंधा-याचे उद्घाटन






v जिल्ह्यात लोकसहभागातून बंधारे बांधण्याचा संकल्प
यवतमाळ, दि. 13 : जिल्ह्यात यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्यामुळे नदी, नाले, आणि ओढ्यांमधून पाणी वाहत आहे. वाहणारे हे पाणी अडवून मृद आणि जलसंधारणाची चळवळ वृध्दींगत करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने लोकसहभागातून वनराई बंधारे बांधण्याचा संकल्प केला आहे. याच धर्तीवर जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी राळेगाव तालुक्यातील मौजे वाटखेड येथे वनराई बंधा-यांचे उद्घाटन केले.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे, राळेगावचे उपविभागीय अधिकारी शैलेश काळे, तहसीलदार डॉ. रविंद्रकुमार कानडजे, गटविकास अधिकारी रविकांत पवार, तालुका कृषी अधिकारी श्री. प्रधान आदी उपस्थित होते.
  जिल्ह्यात यावर्षी पुरेसा पाऊस झाला असून नदी नाल्यातून वाहणारे पाणी अडविणे आणि जिरविणे हयासाठी वनराई बंधारे उपयुक्त ठरतात. या दृष्टीने राळेगाव तालुक्यामध्ये 300 वनराई बंधारे निर्माणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. मौजे वाटखेड येथील नाल्यावर लोकसहभागातून वनराई बंधारा बांधण्यात आला असून जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्या हस्ते या वनराई बंधाऱ्याच्या निर्माण कार्याचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी अजय गुल्हाने म्हणाले, शेतक-यांना संरक्षित सिंचनाची सोय व्हावी म्हणून जास्तीत जास्त बंधारे बांधणे गरजेचे आहे. परिसरातील पाणी पातळीत वाढ होण्याच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या या वनराई बंधा-यासाठी शासकीय यंत्रणेतील गावपातळीवरील कर्मचा-यांपासून वरिष्ठ अधिका-यांपर्यंत सर्वांनी सहभागी व्हावे. याशविाय गावकरी, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी यांनीसुध्दा यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिका-यांनी केले. प्रत्येक तालुक्यात किमान 300 वनराई बंधारे बांधण्याचा संकल्प आहे, असेही ते म्हणाले. कळंब तालुक्यात महसूल, कृषी आणि पंचायत विभागामार्फत खंड क्रमांक 1 येथे बांधण्यात आलेल्या वनराई बंधा-याचे उद्घाटन जिल्हाधिका-यांनी केले.
कार्यक्रमाला मंडळ अधिकारी, ग्रामसेवक, तलाठी आणि गावकरी मोठया प्रमाणात उपस्थित होते.
००००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी