शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबासोबत स्नेहमिलन कार्यक्रम





v जिल्हाधिकारी कार्यालय व ऋणमुल संस्था यांचा उपक्रम

यवतमाळ, दि. 03 : जिल्हाधिकारी कार्यालय व मुंबई येथील ऋणमुल संस्था यांच्यावतीने जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंब  व त्यांच्या पाल्यांसोबत स्नेहमिलनाचा  कार्यक्रम जिहाधिकारी कार्यालय येथे पार पडला.
यावेळी ट्रस्टचे सचिव तथा संचालक ग्रामीण गृहनिर्माण धनंजय माळी, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा आणि निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे यांनी  सदर कुटुंबाला व त्यांच्या पाल्याना मार्गदर्शन केले. वडिलांचे छत्र हरवलेल्या या मुलांना त्यांच्या शिक्षणासाठी साहाय्य करत असताना मुलाच्या आईला उपजीविकेचे साधन मिळवून देऊन कुटुंबाला आर्थिक सक्षम करण्याची आवश्यकता आहे, असे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने म्हणाले.
शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी राज्यातील आजी-माजी वरिष्ठ सनदी अधिकारी व उद्योगक्षेत्रातील प्रमुख व्यक्तींच्या संकल्पनेतून ऋणमुल ही संस्था अस्तित्वात आली. यात माजी मुख्य सचिव रत्नाकर गायकवाड (ट्रस्टचे अध्यक्ष), निवृत्त अतिरिक्त मुख्य सचिव आनंद कुलकर्णी, माजी मुंबई पोलीस आयुक्त अरुप पटनाईक, ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, मुंबई पोलीस स्पेशल आयजी कृष्ण प्रकाश, माजी कोकण विभागीय आयुक्त जगदीश पाटील, ग्रामीण-गृहनिर्माण संचालक धनंजय माळी, मराठी सिने-अभिनेत्री निशिगंधा वाड, मानस कृषी इंडस्ट्रीजचे संस्थापक व्यंकटेश कुलकर्णी आदींचा सहभाग आहे.
बळीराजाप्रति  आपले सामाजिक दायित्व ओळखून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलांना त्यांच्या शैक्षणिक प्रगतीत हातभार लावण्यासाठी यवतमाळ, अकोला, लातूर, उस्मानाबाद आणि परभणी या जिल्यातील 1000 कुटुंबाना मदत करण्याचे ट्रस्टने ध्येय ठरवले आहे. या उपक्रमामध्ये आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील शिक्षण घेत असलेल्या मुलांना दरमहा रु. 2000 पर्यंतची रक्कम मुलांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जात आहेत.
या उपक्रमाचा भाग म्हणून यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त  कुटुंबातील उमरखेड तालुक्यातील टाकळी या गावातील प्रियंका पंजाबराव मारकवार, केळापूर तालुक्यातील सायखेड या गावातील अंकित वीरेंद्र सिंह सेंगर, केळापूर तालुक्यातील सोनुर्ली गावातील मिनल विजय झोटिंग, दारव्हा तालुक्यातील लोहि गावातील पायल दिगंबर डेरे, दारव्हा तालुक्यातील इरथाल येथील प्रियंका भास्कर राठोड, दारव्हा तालुक्यातील रामराव रामे या गावातील आदित्य गणेश बुधे, महागाव तालुक्यातील वरद येथील नेहा सतीश उघडे, महागाव तालुक्यातील करंजखेड येथील शामल रुपेश जांबुतकर, यवतमाळ तालुक्यातील मनपुर येथील साक्षी विजय पारधी व वनी तालुक्यातील राजुर कॉलनी येथील लक्ष्मी प्रमोद बल्की व त्यांचा कुटुंबातील आई, भाऊ, आजोबा उपस्थित होते.
०००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी