एक दिवस मतदारांसोबत मोहीम जिल्हाधिका-यांनी दिल्या घरोघरी भेटी





v नागरिकांनी मतदार नोंदणीमध्ये सक्रीय सहभाग घेण्याचे आवाहन
यवतमाळ, दि. 24 : जिल्हा प्रशासनाच्या वतीने संपूर्ण जिल्ह्यात मतदार याद्यांच्या पुनरिक्षणाचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. यात मतदार नोंदणीकरीता विशेष मोहीम, घरोघरी भेटी आदींचा समावेश आहे. आज (दि.२४) राबविण्यात आलेल्या एक दिवस मतदारांसोबत या मोहिमेंतर्गत जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी यवमाळ येथे घरोघरी भेटी दिल्या. यावेळी त्यांनी नवमतदारांकडून नमुना – ६ अर्ज भरून घेतले. याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, उपविभागीय अधिकारी स्वप्नील तांगडे, मतदार नोंदणी अधिकारी आदी उपस्थित होते.
मतदार नोंदणीकरीता जिल्हा प्रशासनापासून तर ग्रामस्तरापर्यंतचे सर्व अधिकारी-कर्मचारी घरोघरी पोहचत आहे, असे सांगून जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख म्हणाले, मतदार यादी परिपूर्ण आणि अचूक करण्यासाठी या मोहिमेत नागरिकांनी सक्रीय सहभाग घ्यावा. मतदार यादीत चूक असेल तर त्याची दुरुस्ती करण्याच्या सुचना संबंधितांना कराव्यात. तसेच आपले नाव, छायाचित्र आदी बाबी यादीत समाविष्ठ आहे की नाही, याची तपासणी करावी. जिल्ह्यातील महाविद्यालयांच्या सर्व प्राचार्यांनी आपल्या महाविद्यालयातील 18 वर्षांच्या वरील सर्व विद्यार्थ्यांची मतदार म्हणून नोंदणी झाली की नाही, याची खात्री करावी. तसेच सामान्य आस्थापनेवरील दुकानातील नोकरवर्गाची नोंदणी, कामगारांची नोंदणी करण्यावर भर द्यावा. जिल्ह्यात मतदार यादीपासून कोणीही पात्र व्यक्ती वंचित राहता कामा नये, अशा सुचना जिल्हाधिका-यां दिल्या. मोहिमेदरम्यान काही नागरिकांची नावे आली नसल्यास त्यांनी संबंधित तहसील कार्यालयात संपर्क करावा, असेही ते म्हणाले.
तत्पूर्वी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी लोकनायक बापुजी अणे विद्यालय परिसरातील उमा दत्ता कोवे, टिळकवाडी येथील भक्ती महेश जोशी, करण चिंतावार आणि समर्थवाडी येथील अभिजीत सिरसकर या नवमतदार विद्यार्थी-विद्यार्थीनींच्या घरी भेटी दिल्या. यावेळी जिल्हाधिका-यांनी त्यांच्याशी संवाद साधला. मतदार यादीत नाव आले आहे. आता मतदान करणे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे, असे त्यांनी विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना सांगितले.
यावेळी नायब तहसीलदार नरेंद्र थोटे, नोंदणी अधिकारी सत्यम शेंबाळे, मून आदी उपस्थित होते.
००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी