मतदार नोंदणी विशेष मोहिमेदरम्यान 27 हजार नवमतदारांचे अर्ज प्राप्त


v जिल्ह्यातील 2491 मतदान केंद्रावर चावडी वाचन
v जिल्ह्यात 56 हजार मतदारांची नोंदणी
यवतमाळ, दि. 22 : आगामी लोकसभा व विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर जिल्ह्यात 1 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबर 2018 या कालावधीत मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे.  या अंतर्गत जिल्हा प्रशासनाच्यावतीने मतदार नोंदणीच्या तीन विशेष मोहिमा राबविण्यात आल्या. यात एकूण 27 हजार 873 नवमतदारांचे नमुना – 6 चे अर्ज भरून घेण्यात आले. तर आतापर्यंत जिल्ह्यात 56 हजार मतदारांनी नोंदणी केली आहे.
30 सप्टेंबर 2018 रोजी राबविण्यात आलेल्या मतदार नोंदणी विशेष मोहिमेत 9482 अर्ज, 14 ऑक्टोबरच्या मोहिमेत 12032 अर्ज तर 21 ऑक्टोबरच्या विशेष मोहिमत 6359 नवमतदारांचे अर्ज भरण्यात आले. 28 ऑक्टोबर रोजी पुन्हा विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. मतदार याद्यांचे शुध्दीकरण करण्याच्यादष्टीने दिनांक 1 जानेवारी 2019 रोजी वयाचे 18 वर्ष पूर्ण होणा-या नवमतदारांना समाविष्ठ करणे, मयत, स्थलांतरीत व दुबार मतदार वगळणे हा कार्यक्रम जिल्हयात सर्वत्र राबविण्यात येत आहे.
जिल्हयामध्ये एकूण 2491 मतदान केंद्रावर चावडी वाचन कार्यक्रम राबविण्यात आला. यात 76-वणी मतदार संघातील 322 मतदान केंद्रावर, 77-राळेगाव मतदार संघातील 350 मतदान केंद्र, 78-यवतमाळ मतदार संघातील 410 मतदान केंद्र, 79-दिग्रस मतदार संघातील 378 मतदान केंद्र, 80-आर्णि मतदार संघातील 364 मतदान केंद्र, 81-पुसद मतदार संघातील 326 मतदान केंद्र आणि 82-उमरखेड मतदार संघातील 341 मतदान केंद्रांचा समावेश होता. या चावडी वाचनादरम्यान संपूर्ण मतदार संघात 7184 नागरिकांचे नमुना – 6 अर्ज, 726 नागरिकांचे नमुना – 7 अर्ज, 286 नागरिकांचे नमुना – 8 अर्ज तर 17 नागरिकांचे नमुना – 8 अ अर्ज प्राप्त झाले. ग्रामीण भागात सर्व बीएलओ यांच्यामार्फत गावातील सरपंच, पोलीस पाटील, प्रतिष्ठित नागरीक तर शहरी भागात नगर सेवक, सदर भागातील नागरीक यांच्या उपस्थितीत मतदार यादीचे वाचन करण्यात आले. सदर मतदार वाचनाच्या वेळी मयत, दुबार व स्थलांतरीत मतदारांची नावे वगळण्याबाबत प्रस्ताव तयार करण्यात आले.
याअंतर्गत जिल्हयातील सर्व सरकारी गृह निर्माण संस्थांचे अध्यक्ष व सचिव यांची मतदान केंद्रस्तरीय स्वयंसेवक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हयात एकूण 131 सहकारी गृह निर्माण संस्था असून त्यांच्यामार्फत नवीन मतदारांची नोंदणी करून घेण्यात येत आहे. तसेच जिल्हयातील 103 महाविद्यालयांना भेटी देण्यात आल्या असून प्राचार्यामार्फत नवीन मतदारांचे नमुना-6 चा अर्ज भरुन घेऊन त्यांची नोंदणी करण्यात येत आहे. जिल्हयामध्ये दिव्यांग मतदारांना समाविष्ठ करण्याच्यादृष्टीने दिव्यांगासाठी काम करणा-या सामाजिक संस्था, दिव्यांग विद्यालय यांच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहे. तसेच महिला मतदारांची मोठया प्रमाणात नोंदणी करण्याच्यादृष्टीने महिला मेळावे, अंगणवाडी सेविका व आशा स्वयंसेविका यांच्या सभा घेऊन महिला मतदार वाढविण्याकरीता प्रयत्न करण्यात येत आहे.
मतदार यादी शुध्दीकरणाच्यादृष्टीने एक दिवस मतदारांसोबत हा विशेष कार्यक्रम दिनांक 24 ऑक्टोबर रोजी जिल्हयात सर्वत्र राबविण्यात येत आहे. या विशेष कार्यक्रमात बीएलओ यांच्यासोबत सर्व शासकीय, निमशासकीय, अधिकारी, कर्मचारी घरोघरी भेट देणार असून त्या माध्यमातून नवीन मतदार शोधणे तसेच मयत व स्थलांतरीत मतदारांची नावे वगळण्यात येणार आहे. विशेष मोहिमेदरम्यान नागरिकांनी या राष्ट्रीय कार्यक्रमाला सहकार्य करावे व जास्तीत जास्त नवमतदारांनी आपल नावे नोंदवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले आहे.

अ.क्र.
मतदार संघाचे नाव
चावडी  वाचन झालेल्या मतदान केंद्रांची संख्या
चावडी वाचनादरम्यान प्राप्त अर्जांची संख्या
नमुना -6
नमुना-7
नमुना-8
नमुना -8अ
1.
76-वणी
322
1359
38
03
00
2.
77-राळेगाव
350
909
01
98
00
3.
78-यवतमाळ
410
317
139
61
05
4.
79-दिग्रस
378
1203
272
24
09
5.
80-आर्णी
364
820
17
07
03
6.
81-पुसद
326
1670
28
73
00
7.
82-उमरखेड
341
906
231
20
00

एकूण
2491
7184
726
286
17

000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी