शेतकऱ्यांनी रब्बी व उन्हाळी हंगामासाठी विमा काढण्याचे आवाहन अंतिम मुदत 15 डिसेंबर निसर्गाची सुटता साथ, पिक विमा देईल हात

यवतमाळ, दि. 23 नोव्हेंबर (जिमाका):- प्रधानमंत्री पिक विमा योजना सन 2022-23 रब्बी व उन्हाळी हंगामाकरीता लागू करण्यात आली असुन शेतकऱ्यांनी बागायती गहू व हरभरा पिकासाठी विमा भरण्याची अंतिम मुदत १५ डिसेंबर २०२२ व उन्हाळी भुईमूग पिकासाठी विमा भरण्याची अंतिम मुदत 31 मार्च 2023 पर्यंत आहे. जास्तित जास्त शेतकऱ्यांनी रब्बी व उन्हाळी हंगामासाठी विमा काढण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे. कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी बँकेकडे विमा हप्त्यासह प्रस्ताव सादर करावा. यासाठी शासनाने भारतीय कृषी विमा कंपनी लिमिटेड मुंबई क्षत्रिय कार्यालय, स्टॉक एक्सचेंज टॉवर्स, 20 वा मजला, दलाल स्ट्रिट, फोर्ट, मुंबई 400023. टोल फ्री क्रमांक 1800 419 5004 या कंपनीची निवड केलेली आहे. अधिसूचित क्षेत्रातील पिकांसाठी पीक कर्ज घेतल्यास शेतकऱ्यांना देखील या योजनेत सहभाग घेणे बंधनरककारक नाही. मात्र त्यासाठी शेतकऱ्यांनी विमा योजननेत भाग घेण्याच्या अंतिम मुदतिच्या किमान सात दिवस पूर्व संबंधित बँकेस पिक विमा न भरणे बाबत लेखी कळविणे गरजेचे आहे. इतर बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी आपला 7/12 उतारा, बँक पासबुक आधार कार्ड व पीक पेरणीची स्वयंघोषणापत्र घेऊन अधिकृत बँकेत विमा अर्ज देऊन व हप्ता भरून सहभाग घ्यावा हप्ता भरलेली पोहोच पावती शेतकऱ्यांनी जपून ठेवावी. कॉमन सर्विस सेंटर, (CSC) आपले सरकारचे मदतीने शेतकरी विमा योजनेत सहभाग घेऊ शकतात. तसेच www.pmfby.gv.in पोर्टलवर देखील माहिती तसेच अर्ज करणे सुरू आहे. जिल्ह्यातील सर्व शेतक-यांनी पिक विमा योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर यांनी केले आहे . रब्बी व उन्हाळी हंगाम सन 2022 - 23 बागायती गहू - विमा संरक्षित रक्कम 40 हजार 520 रुपये (प्रति हेक्टर), शेतकऱ्यांना भरावयाचा पीक विमा हप्ता रुपये प्रति हेक्टरी. 607 रुपये 80 पैसे आहे. हरभरा - विमा संरक्षित रक्कम (रुपये प्रति हेक्टर) 39 हजार 218 रुपये, शेतकऱ्यांना भरावयाचा पिक विमा हप्ता रुपये (प्रति हेक्टरी) 588 रुपये 27 पैसे , उन्हाळी भुईमूग विमा संरक्षित रक्कम (रुपये प्रति हेक्टर) 42 हजार 971 रुपये, शेतकऱ्यांना भरावयाचा पिका विमा हप्ता रुपये प्रति हेक्टरी 644 रुपये 57 पैसे आहे. *पीक नुकसानीची माहिती कळविण्याची पद्धत* विमा संरक्षण घेतलेल्या शेतकऱ्यांनी घटना घडल्यापासून 72 तासाच्या आत याबाबतची सूचना विमा कंपनी, संबंधित बँक, कृषी / महसूल विभाग किंवा टोल फ्री क्रमांक 1800 419 5004 या क्रमांकावर कळविण्यात यावी. *विमा संरक्षणाच्या बाबी* पीक पेरणी पासून काढणी पर्यंतच्या कालावधीत उत्पादनात येणारी घट, पीक पेरणीपूर्व /लावणी पूर्व नुकसान भरपाई निश्चित करणे, हंगामातील प्रतिकूल परिस्थितीत नुकसान भरपाई निश्चित करणे, काढणी पश्चात नुकसान, स्थानिक नैसर्गिक आपत्ती. विमा प्रस्तावासोबत आवश्यक कागदपत्रे बँकेस विमा प्रस्ताव सादर करतेवेळी सर्व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी फोटो असलेल्या बँक पास खाते पुस्तकाची प्रत तसेच आधार कार्ड छायांकित प्रत सादर करणे आवश्यक आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी