सुशिक्षित बेरोजगारांनी रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा

यवतमाळ,दि.२५ नोव्हेंबर (जिमाका):- जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्यामार्फत ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन 27 नोव्हेंबर 2022 पर्यंत करण्यात आलेले आहे. सदर मेळाव्याकरिता जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांना rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने विविध पदासाठी शैक्षणिक पात्रतेनुसार पसंती क्रम देत सहभागी व्हावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त विद्या शितोडे यांनी केले आहे. स्थानिक पातळीवर तसेच इतर ठिकाणी औद्योगिक संस्थांना मनुष्यबळाची मागणी नोंदविण्यात आलेली आहे. मागणीला अनुसरून जिल्ह्यातील तसेच इतर ठिकाणाच्या कंपनीशी संपर्क साधून मुथूट फायनान्स यवतमाळ,आर.सी.सी.पी.एल. प्रा.ली. मुकुटबन व उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक यवतमाळ या कंपनी मार्फत एकूण 111 रिक्त पदाकरिता ऑनलाइन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदर मेळाव्या करिता जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांना rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने विविध पदासाठी शैक्षणिक पात्रतेनुसार पसंती क्रम देत सहभागी होता येणार आहे. सदर मेळाव्यामध्ये किमान 12 वी.परीक्षा उत्तीर्ण, इंजिनिअरींग डिप्लोमा, इंजीनियरिंग,पदवीधारण केलेले रोजगार इच्छुक उमेदवारांना त्यांच्याकडील सेवा योजना कार्ड (एम्प्लॉयमेंट कार्ड) चा युजरनेम व पासवर्ड लॉगिन करून सदर मेळाव्यामध्ये सहभागी होता येणार आहे. त्यासाठी उमेदवाराकडे सेवायोजन कार्ड (एम्प्लॉयमेंट कार्ड)चा युजर नेम व पासवर्ड असणे आवश्यक आहे. नसल्यास rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावरून ऑनलाइन पद्धतीने कार्ड ची नोंदणी करता येईल. सदर मेळाव्यास उद्योजकांकडून ऑनलाईन पद्धतीने मुलाखती/उमेदवाराशी प्रत्यक्ष संपर्क साधून रिक्त पदांकरिता निवड करण्यात येणार आहे. यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांनी या मेळाव्याचा ऑनलाईन पद्धतीने लाभ घ्यावा,तसेच मेळाव्याचा अधिक माहितीसाठी 07232-244395 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन सहाय्यक आयुक्त विद्या शितोडे यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी