१३ नोव्हेंबरला शासकिय योजनांचा महामेळावा

यवतमाळ, दि. 11 नोव्हेंबर (जिमाका):- पॅन इंडिया कार्यक्रमाअंतर्गत गावोगावी दूर्गम भागात जावून जनसामान्यांना मोफत कायदेविषयक माहितीचा प्रचार व प्रसार पॅरा विधी स्वंयसेवकांमार्फत करण्यात येत आहे.त्याअनुषंगाने जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय व जिल्हा प्रशासन यांचे संयुक्त विद्यमाने सामान्य नागरीकांना त्यांच्या सेवा योग्य वेळेत मिळाव्यात याकरीता शासकीय योजनांचा महामेळाव्याचे आयोजन 13 नोव्हेंबरला सकाळी साडेनऊ वाजता “बळीराजा चेतना भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, येथे करण्यात आले आहे. यवतमाळ तालुक्यातील सर्व नागरीकांनी ह्या शासकीय योजनांच्या महामेळाव्याचा लाभ घेण्याचे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.व्ही.हांडे, यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

अमली पदार्थापासून व्यसनमुक्तीकडे …

नीती आयोगाच्या केंद्रीय अधिकाऱ्यांकडून झरी जामणी येथील योजनांचा आढावा पुसद व झरी जामणीचा आकांक्षित तालुक्यात समावेश केंद्रीय प्रभारी अधिकारी म्हणून पल्लवी होळकर यांची नियुक्ती