रोजगार केंद्रामध्ये नांव नोंदवलेल्या उमेदवारांनी आधार क्रमांक जोडावा

यवतमाळ, दि. 11 नोव्हेंबर (जिमाका):- जिल्ह्यातील सर्व नोकरी ईच्छुक व नोकरीसाठी सेवायोजन कार्यालयाकडे नावनोंदणी केलेल्या उमेदवारांनी आपल्या नोंदणीला आपले आधार कार्ड www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने आधार लिंक पूर्ण करावे असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त विद्या शितोळे यांनी केले आहे. महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या सर्व सेवा व सुविधा आता या संकेतस्थळाच्या माध्यमातून ऑनलाईन पध्दतीने पुरविण्यात येतात. याव्दारे उमेदवारांस प्रामुख्याने राज्यभरातील वेळोवेळी आयोजित करण्यात येणाऱ्या विविध रोजगार मेळाव्याची सर्व माहिती मिळविणे आणि त्यासाठी उत्सुकता व पसंतीक्रम नोंदविणे, रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थी म्हणून सहभाग मिळविणे, केंद्र व राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कौशल्य विकास योजना व कौशल्य प्रशिक्षण देणाऱ्या संस्था यांची माहिती प्राप्त करणे, आणि सहभाग घेणे, आपली शैक्षणिक पात्रता वाढविणे, पत्ता, संपर्क क्रमांक, ई-मेल यांमध्ये दुरुस्ती करणे तसेच वेगवेगळ्या उद्योजकांनी वेळोवेळी अधिसूचीत केलेली रिक्तपदांची माहिती मिळवून त्यासाठी आपल्या उमेदवारीचा अर्ज सादर करणे, इ.बाबींचा समावेश होतो. उद्योजकांनी वेळोवेळी गरज व मागणीनुसार डाऊनलोड केलेल्या उमेदवारांच्या याद्यांमध्ये समावेश होण्यासाठी नोंदणीस आधार कार्ड लिंक असणे आवश्यक आहे. अशा अनेक बाबींचा लाभ मिळविण्यासाठी प्रत्येक उमेदवाराने नोंदणीस आधार कार्ड जोडणी (लिंक) करणे आवश्यक आहे, अन्यथा उमेदवार या प्रकारच्या संधी पासून वंचित राहू शकतो. आधार नोंदणी केल्यानंतर किंवा याबाबत काही अडचणी असल्यास जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र या कार्यालयास ०७२३२-२४४३९५ या दुरध्वनी क्रमांकावर अथवा yavatmalrojgar@gmail.com, asstdiremp.yavatmal@ese.maharashtra.gov.in या ई-मेलव्दारे संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त विद्या शितोळे यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी