मतदारांनी मतदार यादीतील नावाची खात्री करुन घ्यावी -जिल्हाधिकारी यांचे आवाहन

यवतमाळ, दि 17, (जिमाका):- एकीकृत प्रारूप मतदार यादी 9 नोव्हेंबरला प्रसिद्ध झाली असुन मतदार यादिवर 8 डिसेंबरपर्यंत दावे आणि हरकती स्वीकारण्यात येणार आहे. तसेच मतदार नोंदणीसाठी 4 विशेष शिबिरे 19 आणि 20 नोव्हेंबर, 3 आणि 4 डिसेंबर रोजी होणार आहे. मतदारांनी आपले नाव मतदार यादित आहे का याची खात्री करुन घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले. तृतीयपंथी,देह व्यवसाय करणाऱ्या महिला, घर नसलेले भटक्या व विमुक्त जमातीच्या व्यक्ती या लक्षित घटकांसाठी विशेष शिबिरे 26 व 27 नोव्हेंबरला होणार आहे. दावे आणि हरकती 26 डिसेंबर पर्यंत निकालात काढण्यात येतील. अंतिम मतदार यादीची प्रसिध्दी 5 जानेवारी, 2023 ला करण्यात येईल. सन 2023 च्या जानेवारी, एप्रील,जुलै, ऑक्टोबर महिन्याच्या 1 तारखेला किंवा त्याच्या आधी 18 वर्ष पुर्ण करणारी व्यक्ती विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत अर्ज क्र.6 भरुन आगाऊ मतदार नोंदणी करु शकतात. ऑनलाइन मतदार नोंदणीसाठी https://nvsp.in, https://voterportal.eci.gov.in या संकेतस्थळावर करता येईल. किंवा Voter Helpline हे मोबाइल ॲप दाऊनलोड करुन करता येईल. प्रत्यक्ष मतदार नोंदणीसाठी आपल्या जवळच्या मतदार नोंदणी केंद्राला भेट द्यावी. मतदार मदत क्रमांकावर 1800 22 1950 संपर्क करता येईल.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी