डॉ. एस. एस. गडकरी वार्षिक स्मृती पुरस्कारसाठी अर्ज आमंत्रित

यवतमाळ,दि.11नोव्हें,(जिमाका) : भारतीय लोकप्रशासन संस्थेच्या महाराष्ट्र प्रादेशिक शाखेच्या वतिने 2016 पासून "लोकप्रशासनातील नवोपक्रमासाठी कै. डॉ. एस. एस. गडकरी वार्षिक स्मृती पुरस्कार" सुरू केला आहे. सन २०२२-२३ साठी प्रशासनातिल अधिकारी , कर्मचारी यांच्याकडून पुरस्कारासाठी योग्य नामांकन आणि नावीन्यपूर्ण कल्पनेच्या सारांशासह 28 फेब्रुवारी 2023 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज भारतीय लोक प्रशासन संस्था महाराष्ट्र प्रादेशिक शाखा तळमजला, बँक ऑफ महाराष्ट्रच्या शेजारी, मादम कामा रोड, मंत्रालय मुंबई येथे पाठवावा. भारतीय लोकप्रशासन संस्थेची महाराष्ट्र प्रादेशिक शाखा सार्वजनिक प्रशासनाच्या विकासाच्या क्षेत्रात काम करत असून शाखा विविध उपक्रम राबवते. प्रशिक्षण कार्यक्रम, परिषदा, लोकांसाठी निबंध स्पर्धा, वार्षिक स्मृती व्याख्याने, सार्वजनिक प्रशासनाशी संबंधित संशोधन प्रकल्प इत्यादी क्षेत्रात काम करते. नागरिकांच्या सेवेसाठी नाविन्यपूर्ण कल्पनांचा अवलंब करून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून दर्जेदार सार्वजनिक सेवा प्रदान करण्यासाठी, शाखेने 2016 पासून "लोकप्रशासनातील नवोपक्रमासाठी कै. डॉ. एस. एस. गडकरी वार्षिक स्मृती पुरस्कार" सुरू केला आहे. पुरस्काराचे स्वरूप रु. १० हजार रुपये आणि सन्मानचिन्ह असे आहे. पुरस्कारासाठी नामांकन पाठवण्याचा निकष असे आहेत. कर्मचाऱ्याने नाविन्यपूर्ण कल्पना विकसित केलेली असावी, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला असावा जो कार्यक्षम, परिणामकारक, वेळेची बचत, पारदर्शक, नागरिक केंद्रित आणि सार्वजनिक सेवा देण्यासाठी त्रासमुक्त असल्याचे सिद्ध झाले आहे. नावीन्य हे विद्यमान नियम आणि कार्यालयीन चौकटीत असणे आवश्यक आहे. सांगितलेली नाविन्यपूर्ण प्रणाली स्वीकारली गेली आहे असुन ती कार्यालयात यशस्वीपणे अंमलात आणली जात आहे अशी असावी. कर्मचा-याचे नामनिर्देशन पूर्ण औचित्यसह शाखेकडे पाठवावे. तसेच अधिक माहितीसाठी दूरध्वनी 22024243/22854156 आणि js.mrb-lipa@gov.in या ईमेलद्वारे संपर्क करावा असे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक अडमिनिस्ट्रेशन महाराष्ट्र प्रादेशिक शाखा यांनी कळविले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी