जात पडतळणी शिबीराचे आयोजन २४ नोव्हेंबरला

यवतमाळ, दि.18 नाव्हेंबर (जिमाका):-मंडणगड पॅटर्नची अंमलबजावणी बाबत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी,समिती यवतमाळ यांच्या मार्फत यवतमाळ तालुक्यातील सर्व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयात 24 नोव्हेंबर 2022 रोजी जात प्रमाणपत्र पडताळणी,(व्हॅलेडीटी सर्टिफिकेट) कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. सन 2022-23 मधील प्रवेशित 11 व 12 वी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांकरिता जात प्रमाणपत्र पडताळणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,पळसवाडी कॅम्प, दक्षता भवन पाठीमागे दारव्हा रोड,यवतमाळ येथे 11 ते 5 या वेळेत करण्यात येईल. सदर कार्यशाळेत 11 वी व 12 वी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांनी आपला परिपूर्ण अर्ज https://barti.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर भरून त्याचे प्रिंट आऊट काढून कार्यशाळेत सादर करावे. सदर कार्यशाळेतील प्राप्त प्रस्ताव त्वरित निकाली काढून जात वैधता प्रमाणपत्राचे वाटप सामाजिक न्याय दिनी 26 नोव्हेंबर रोजी समारंभ पूर्वक करण्यात येईल. सदर शिबिराचा लाभ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी घ्यावा,असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणीचे समितीचे अध्यक्ष डॉक्टर माधव कुसेकर व उपायुक्त दिलीप राठोड यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी