नव उद्योजकांसाठी 'मार्जिन मनी”योजना'

यवतमाळ,दि.२४ नाव्हेंबर (जिमाक):- केंद्र शासनाच्या “स्टॅड अप इंडीया” योजनेंतर्गत अनुसुचित जाती व नवबौध्द समाजच्या घटकांकरीता “मार्जिन मनी” योजना सुरू करण्यात आलेली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील इच्छुक नव उद्योजक तरूणांनी सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी 5 डिसेंबर अर्ज सादर करण्याचे आवाहन सहायक आयुक्त समाज कल्याण रामसिंग चव्हाण यांनी केले आहे. या योजनेसाठी 18 वर्षावरील नव उद्योजक पात्र आहेत. उद्योग सुरू करण्यासाठी स्टँड अप इंडीया योजने अंतर्गत 75 टक्के कर्ज मंजूर झाल्यानंतर उर्वरीत फ्रंट एंड सबसिडी अनुषंगाने नव उद्योजकांना प्रकल्प मुल्यांच्या 15 टक्के अनूदान राज्य शासनामार्फत मार्जिन मनी म्हणुन देण्यात येते. तसेच 10 टक्के स्वहिस्सा उमेदवाराला भरावा लागतो. सदर “मार्जिन मनी” योजना समाज कल्याण विभागमार्फत राबविण्यात येत आहे. शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर सदर शासन निर्णय निरीक्षणासाठी उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी सहायक आयुक्त,समाज कल्याण, पळसवाडी कॅम्प,दारव्हा रोड यवतमाळ या कार्यालयाशी संपर्क साधावा.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी