लोकसहभागातुन बांधणार वनराई बंधारे

यवतमाळ, दि. ११ नोव्हेंबर (जिमाका):- या वर्षात जिल्हयात मोठया प्रमाणात पाऊस झालेला आहे. सद्यस्थितीत ओढे-नाले भरुन वाहत आहेत. ओढे-नाले यामधील वाहून जाणारे पाणी अडवुन पिकांना संरक्षित सिंचन देणे, जनावरांना पिण्याचे पाणी उपलब्ध होण्यासाठी लोकसहभागातुन जिल्ह्यात वनराई बंधारे बांधण्याचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. वनराई बंधाऱ्यातील पाण्याचा उपयोग पिण्याच्या पाणी, गुरांना पाणी, बंधाऱ्याच्या आजुबाजूला असलेल्या विहिरीच्या पाण्याच्या पातळीत वाढ तसेच रब्बी व उन्हाळी हंगामामध्ये भाजीपाला/कडधान्ये, कलिंगड यासारखी पिके घेण्यासाठी होतो. वनराई बंधारे पाणलोट क्षेत्रामध्ये व पाणलोट क्षेत्राच्या बाहेरही घेता येतात. वनराई बंधारे बांधण्याकरीता रिकामी पोती, रेती व काळी माती वापरुन बांध तयार करण्यात येतात. तसेच जास्तीत जास्त वनराई बंधारे बांधण्याकरीता जिल्ह्यातील सर्व लोकांनी उस्फुर्त प्रतिसाद देऊन या उपक्रमामध्ये सहभाग नोंदवावा असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

अमली पदार्थापासून व्यसनमुक्तीकडे …

यवतमाळ येथे 335 कोटी रु.च्या विविध विकास कामांचे लोकार्पण, भूमिपूजन आदिवासींच्या जीवनात येत्या ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस