राष्ट्रीय युवा पुरस्कारकरीता प्रस्ताव आमंत्रित*

यवतमाळ, दि 2 नोव्हेंबर, (जिमाका) :- सन 2020-21 या वर्षाकरिता राष्ट्रीय युवा पुरस्कारासाठी अर्ज मागविण्यात आले आहे. 15 ते 29 वर्षे या वयोगटातील युवक, युवती आणि नोंदणीकृत संस्था यांनी 6 नोव्हेंबर 2022 पर्यंत विहित शिफारसीसह प्रस्ताव https://awards.gov.in या केंद्र शासनाच्या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज सादर करावेत. राष्ट्रीय विकास व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनिय कार्य तसेच आरोग्य, संशोधन आणि नाविन्य, सांस्कृतीक, मानवाधिकार, प्रोत्साहन, कला व साहित्य, पर्यटन, परंपरागत औषधी, जागरुक नागरीक, समुदाय सेवा, क्रीडा व शैक्षणिक क्षेत्रात विकासात्मक कार्य आणि स्मार्ट शिक्षण या क्षेत्रात काम करणारे युवक, युवती या पुरस्कारासाठी पात्र आहेत. 15 ते 29 वयोगटातील युवक-युवती व पंजिबध्द संस्था यांनी 6 नोव्हेंबर 2022 पर्यंत ऑनलाईल पध्दतीने भरुन त्या प्रस्तावाच्या प्रती आवश्यक सर्व कागदपत्रांसह व शिफारसीसह जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यवतमाळ या ठीकाणी सादर करणे आवश्यक आहे. https://awards.gov.in या पोर्टल व्यतीरीक्त इतर मार्गाद्वारे प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केल्या जाणार नाही, असे जिल्हा क्रिडा अधिकारी नंदा खुरपुडे यांनी कळविले आहे.

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

अमली पदार्थापासून व्यसनमुक्तीकडे …

नीती आयोगाच्या केंद्रीय अधिकाऱ्यांकडून झरी जामणी येथील योजनांचा आढावा पुसद व झरी जामणीचा आकांक्षित तालुक्यात समावेश केंद्रीय प्रभारी अधिकारी म्हणून पल्लवी होळकर यांची नियुक्ती