वसतिगृह प्रवेशासाठी ऑनलाईन संकेतस्थळ पुन्हा सुरु अनुसुचित जमातिच्या विद्यार्थ्यांना २६ नोव्हेंबरपर्यंत करता येणार अर्ज

वसतिगृह प्रवेशासाठी ऑनलाईन संकेतस्थळ पुन्हा सुरु अनुसुचित जमातिच्या विद्यार्थ्यांना २६ नोव्हेंबरपर्यंत करता येणार अर्ज यवतमाळ दि.24 नोव्हेंबर (जिमाका): अभियांत्रकी, वैद्यकिय व विद्यापीठ अभ्यासक्रमासाठी २०२२- २३ या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांकरीता वसतीगृह प्रवेशाचा अर्ज ऑनलाईन भरण्याकरीता 26 नोव्हेंबर 2022 पर्यंत ऑनलाईन संकेतस्थळ पुन्हा सुरू करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी वसतिगृह प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज सादर करावेत. प्रकल्प कार्यालय पांढरकवडा अंतर्गत वसतीगृहात रिक्त असलेल्या जागा अशा आहेत. मुलांचे वसतीगृह कळंब-36, राळेगाव -28 , वणी -59, झरी जामणी -55 , पांढरकवडा - 11 , घाटंजी -29 तसेच मुलींचे वसतीगृह कळंब- 38 ,वणी - 20 झरी जमाणी- 29 , घाटंजी - 7 याप्रमाणे जागा उपलब्ध आहेत. सन 2022-23 या वर्षाकरीता अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांकरीता शासकिय वसतीगृहात प्रवेशासाठी https://swayam.mahaonline.gov.in या संकेतस्थळ ऑनलाईन अर्ज सादर करावा असे आवाहन सहायक जिल्हाधिकारी,तथा प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प याशनी नागराजन यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी