मतदार जागृतिसाठी निघाली सायकल रॅली एकिकृत प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध नागरिकांनी दावे व हरकती नोंदवाव्या* उद्या विशेष ग्रामसभेचे आयोजन*

यवतमाळ, दि ९ जिमाका:- लोकशाही मजबूत करण्यासाठी लोकांनी मतदानाचा हक्क बजावणे गरजेचे आहे. पण मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदार यादीत आपले नाव नोंदवणे आणि मतदार यादीत नाव आहे की नाही याची तपासणी करण्याचे कर्तव्य नागरिकांनी पार पाडून देशाचे भाग्यविधाते व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले अमृत महोत्सावानिमित्त १ जानेवारी २०२३ या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्रांसह मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार जागृतीकरीता आज सकाळी सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी समता मैदान येथुन रॅलीला मार्गस्थ केले. ही रॅली समता मैदान येथुन पुनम चौक, मेनलाईन, तहसिल चौक, आर्णी रोड, आर्णी नाका, संविधान चौक, जिल्हाधिकारी कार्यालया समोरुन समता मैदान येथे समाप्त झाली. या सायकल रॅलीच्या समारोप प्रसंगी त्यांनी उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन केले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी ललित कुमार व-हाडे, उपजिल्हाधिकारी निवडणूक स्नेहल कनिचे उपविभागीय अधिकारी अनिरुद्ध बक्षी, तहसीलदार कुणाल झाल्टे उपस्थित होते. रॅलीत महाविद्यालयीन विद्यार्थी आणि कर्मचारी सहभागी झाले होते. पुढे बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले,सक्षम लोकशाहिची पहिली पायरी ही मतदार नोंदणी आहे. २०२३ च्या जानेवारी, एप्रिल, जुलै आणि ओक्टोबर महिन्याच्या १ तारखेला १८ वर्ष पूर्ण होणार असलेल्या किंवा १८ वर्ष पुर्ण झालेल्या नागरिकांना ९ नोव्हेंबर ते ८ डिसेंबर पर्यंत मतदार यादित नाव नोंदविता येते. नमुना ६ भरुन मतदार नाव नोंदणी करु शकतात. महाविद्यालयिन विद्यार्थ्यानी मोठ्या प्रमाणात मतदार नोंदणी करावी. मतदार ओळखपत्राला आधार क्रमांक संलग्न करणे, मतदारांचे मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट करणे, मतदार यादीतील दुरुस्ती करणे तसेच स्थलांतरीत/मयत मतदारांचे नाव वगळणे हे काम या दरम्यान होणार असुन सर्वानी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले. आज एकिकृत मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली असून या मतदार यादीवर ९ नोव्हेंबर ते ८ डिसेंबर यादरम्यान नागरिकांना दावे व हरकती घेता येऊ शकतात. उद्या १० नोव्हेंबर रोजी मतदार यादीचे वाचन करण्यासाठी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले आहे. मतदार नोंदणीसाठी १९,२० नोव्हेंबर आणि ३, ४ डिसेंबर या दिवशी विशेष शिबिर आयोजित करण्यात येत आहे. तसेच दिव्यांग, विद्यार्थी आणि महिला यांच्यासाठी १२ व १३ नोव्हेंबर, तृतीयपंथी, देह व्यवसायात असलेल्या महिला, घर नसलेल्या विमुक्त व भटक्या जमातीतील व्यक्ती यांच्यासाठी २६,२७ नोव्हेंबर रोजी विशेष शिबीर असणार आहे. दावे आणि हरकती २६ डिसेंबर पर्यंत निकाली काढण्यात येतील. त्यानंतर अंतिम मतदार यादी पाच जानेवारी रोजी प्रसिद्ध करण्यात येईल.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी