अभिलेख व्यवस्थापनशास्त्र कार्यशाळेचे आयोजन

यवतमाळ,दि २८, जिमाका - शासनाच्या विविध विभागामध्ये अभिलेख जतन करण्याचे कामकाज सुरू असते. परंतु शास्त्रशुध्द माहीती अभावी महत्वाचे कागदपत्र, दस्तावेज, जुने महत्वपुर्ण कागदपत्र जतन करताना अनेक अडचणी येतात. त्यामुळे महत्वाचा दस्तावेज नामशेष होण्याची भिती असते. तसेच सर्वसामान्य जनतेची महत्वाची कागदपत्रे सुध्दा शासकीय कार्यालयामध्ये चांगल्या व सुस्थितीत कालांतराने उपलब्ध होत नाही. या सर्वांचे जतन कशा पध्दतीने करावे. यासाठी पुराभिलेख संचालनालयातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयात बचत भवन येथे १ डिसेंबरला एक दिवशीय अभिलेख व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षण कार्यशाळेचा लाभ सर्व विभागातील अभिलेख सांभाळणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांनी तसेच शाळा, महाविद्यालये, लेखक, अभ्यासक, वाचनालये यामध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात येत आहे. या कार्यशाळेस पुराभिलेख संचालनालयाची तज्ञ मंडळी मार्गदर्शन करणार आहेत. दिवसभर ही कार्यशाळा चालणार असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या वतीने कळविण्यात येत

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी