अग्निवीरवायु म्हणून तरुणांना वायुसेनेत नोकरीची संधी 23 नोव्हेंबरपर्यंत करता येणार अर्ज यवतमाळ, दि. 11 नोव्हेंबर (जिमाका):- भारतीय वायुसेनेच्या अग्निपथ या योजनेअंतर्गत अग्निवीर वायु म्हणुन भारतीय वायु सेनेत प्रवेश घेवु इच्छिणाऱ्या तरुण- तरूणींना सुवर्ण संधी प्राप्त झालेली आहे. अग्निवीरवायु या पदासाठी २३ नोव्हेंबर पर्यंत अर्ज सादर करता येणार आहे. भारतीय वायु सेनेत सहभागी होणेकरीता अग्निवीर वायु पदाची परीक्षा देणे आवश्यक आहे. त्याकरीता http://agnipathvayu.cdac.in या संकेतस्थळावर अर्ज सादर करावा,असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त विद्या शितोळे यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

अमली पदार्थापासून व्यसनमुक्तीकडे …

घरकुल लाभार्थ्यांशी मुख्यमंत्र्यांचा संवाद