विडमुळे निराधार झालेल्या ३१७ बालकांना बालन्याय निधीतुन आर्थिक सहाय्य* जिल्ह्यास 55 लक्ष रुपये प्राप्त; 31 लक्ष ,61 हजार खर्च कोविडमुळे निराधार झालेल्या उर्वरित बालकांनी तात्काळ अर्ज करावा महिला व बाल विकास विभागाद्वारे मिळाली आर्थिक मदत

यवतमाळ दि. 3 नोव्हेंबर (जिमाका) :- कोविड-19 मुळे अनेकांनी आपले जवळचे व्यक्ती गमावले. जिल्ह्यातील ५१८ बालकांनी आई किंवा वडील कोविडमुळे गमावले आहेत.(मुले- २७३ व मुली २४५)यातील १२ बालकांनी आई-वडील गमावले. या बालकांना सहाय्य म्हणून बाल न्याय निधी अंतर्गत आर्थिक सहाय्य देण्यात आले. यामधून ३१७ बालकांना ३१ लक्ष ६१ हजार रुपये निधी त्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आला आहे. उर्वरित बालकांनी या आर्थिक सहाय्यासाठी तात्काळ अर्ज सादर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे. या निराधार बालकांना शासनाद्वारे विविध योजनांचा लाभ दिला जात आहे. याचाच एक भाग म्हणून सर्वोच्च न्यायालयाद्वारे महिला व बाल विकास विभागास बाल न्याय निधी उपलब्ध करून देण्यात आला. या निधीतून कोविड मुळे एक किंवा दोन्ही पालक दगावलेल्या बालकांना त्यांचे शालेय शुल्क, वसतीगृह शुल्क व शालेय साहित्य खरेदी करिता आर्थिक मदत देण्यात येत आहे. या बाल न्याय निधी अंतर्गत यवतमाळ जिल्ह्यास ५५ लक्ष रुपये निधी उपलब्ध झाला व या निधीतून मार्गदर्शन सूचनानुसार ३१७ कोविड मुळे पालक दगावलेल्या बालकांच्या बँक खात्यात ३१ लक्ष ६१ हजार रुपये निधी वितरित करून आर्थिक मदत करण्यात आली. बाल न्याय निधी अंतर्गत कोविडमुळे पालक दगावलेल्या ६ वर्षांवरील व १८ वर्षाआतील बालकांनी योजनेचा लाभ घेण्याकरिता तालुक्यातील मिशन वास्तल्य समितीकडे तहसील कार्यालय, बाल विकास प्रकल्प अधिकारी व तालुका संरक्षण अधिकारी यांच्याकडे विहित नमुन्यात आवश्यक कागदपत्रासह अर्ज करावा. गरजू बालकांनी शालेय शुल्क, वसतिगृह शुल्क व शालेय साहित्य खरेदी करिता आर्थिक मदत मिळण्याकरिता तालुका मिशन वात्सल्य समितीकडे संपर्क करून त्वरित अर्ज करावा. या योजनेचा लाभ देण्यात आलेल्या लाभार्थीची यादी जिल्हा बाल संरक्षण कक्ष येथे व www.yavatmal.gov.in या यवतमाळ जिल्ह्याच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी