पॅन इंडिया कार्यक्रमाचे उद्घाटन संपन्न* *१३ नोव्हेंबरपर्यंत विविध कायद्यांची करणार जनजागृती*

यवतमाळ दि. 2 नोव्हेंबर (जिमाका) :- जनसामान्य नागरीकांमध्ये कायदेविषयक माहितीचा प्रचार व प्रसार व्हावा या उद्देशाने राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधि सेवा प्राधिकरण,मुंबई यांचे संयुक्त विद्यमाने 13 नोव्हेंबर 2022 पर्यंत कायदेविषयक शिबीराचे आयोजन करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने 1 नोव्हेंबरला जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय, यवतमाळ येथे पॅन इंडिया कार्यक्रमाचे उद्घाटन प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉक्टर जी.पी. कवडीकर यांचे हस्ते करण्यात आले. सकल भारत कायदेविषयक जनजागृती अभियांतर्गत नागरीकांचे सशक्क्तिकरण आणि “हक हमारा भी तो है' हा कार्यक्रम राबविण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने निर्देशीत करण्यात केले आहे. १ नोव्हे ते १३ नोव्हेंबर या कालावधीत विविध माध्यामातुन जनतेपर्यंत कयादेविषयक माहिती पोहचविण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन श्रीमती कवडिकर यांच्या हस्ते पार पडले. यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव तथा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर, यवतमाळ, के.ए. नहार, वकील मंडळी, पॅरा विधी सेवा स्वंयसेवक, अमोलकचंद विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी तसेच कर्मचारी वर्ग उपस्थीत होते.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी