जिल्ह्याचे सिंचन वाढविण्याचे उद्दिष्ट ठेवा - पालकमंत्री मदन येरावार

Ø पालकमंत्र्यांनी घेतली विविध विषयांबाबत आढावा बैठक
यवतमाळ, दि. 31 : सिंचन हा जिल्ह्यासाठी अतिशय महत्वाचा विषय आहे. जिल्ह्यात 9 लक्ष 10 हजार हेक्टर क्षेत्र विविध पिकांच्या लागवडीखाली आहे. सिंचनामुळे मुलभुत विकास होणार असल्यामुळे जिल्ह्यातील सिंचन क्षेत्र वाढविण्याचे उद्दिष्ट ठेवा, असे प्रतिपादन पालकमंत्री मदन येरावार यांनी केले.  
जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विषयांबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, उपजिल्हाधिकारी चंद्रकांत जाजू, निम्न पैनगंगाचे कार्यकारी अभियंता बी.पी.चाटे, एस.डी. कुंभारे, श्रीकांत उमप, रा.की. भरणे उपस्थित होते.
बेंबळा व इतर प्रकल्पाच्या पुनर्वसनाचा आढावा घेतांना पालकमंत्री येरावार म्हणाले, जिल्ह्यातील सिंचनासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून निधीची कमतरता भासणार नाही. सिंचन क्षमता वाढविण्यासाठी गतीने काम होणे गरजेचे आहे. त्यामुळे उर्वरीत पाटस-यांची कामे त्वरीत पूर्ण करा. जिल्ह्यातील संपूर्ण पाणी अडविणे महत्वाचे आहे. जमीन अधिग्रहण टाळण्यासाठी पाईपलाईनद्वारे कामे सुरु आहे. पुनर्वसनासाठी यवतमाळ हे उत्कृष्ट मॉडेल बनले पाहिजे. पुनर्वसन होणा-या नागरिकांना 18 नागरी सुविधा उत्कृष्ट दिल्या तर कोणीही विकासाला विरोध करणार नाही. याबाबत योग्य नियोजन करून त्वरीत कामे पूर्ण करण्यावर भर द्या, अशा सुचना पालकमंत्र्यांनी केल्या.
यावेळी त्यांनी लोअर पैनगंगा, बेंबळाचे उर्वरीत काम, सध्याची सिंचन क्षमता आदींची माहिती घेतली. तसेच टी.बी.रुग्णालय जागा हस्तांतरण आणि स्व. मोतिरामजी लहाने कृषी समृध्दी प्रकल्पाचा आढावा घेतला. बैठकीला नगर पालिका प्रशासन अधिकारी शशीकुमार नंदा, केम प्रकल्पाचे प्रकल्प संचालक, आत्माचे प्रकल्प संचालक डी.बी. काळे यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
                                                000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी