कापूस, सोयाबीन खरेदी केंद्र

जिल्हाधिका-यांनी घेतली आढावा बैठक

यवतमाळ, दि. 23 : कापूस आणि सोयाबीन खरेदी केंद्रासंदर्भात जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. यावेळी जिल्हा उपनिबंधक गौतम वर्धन, कापूस उत्पादन पणन महासंघाचे विभागीय व्यवस्थापक सी.पी.गोस्वामी, जिल्हा मार्केटिंग अधिकारी जी.एन. मगरे उपस्थित होते.
जिल्ह्यात कापूस आणि सोयाबीनचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते, असे सांगून जिल्हाधिकारी डॉ. देशमुख म्हणाले, सोयाबीन आणि कापूस खरेदी केंद्र तातडीने सुरू करा. कोणताही शेतकरी नोंदणी पासून वंचित राहता कामा नये. तातडीने सर्वांनी नोंदणी करून घेणे गरजेचे आहे. याबाबत शेतक-यांना विविध माध्यमातून जनजागृतीद्वारे माहिती द्या. शासनाच्या मागदर्शक सुचनांचे पालन करून नोंदणी प्रक्रिया वेळेत पूर्ण करा, अशा सूचना केल्या. यावेळी त्यांनी सीसीआय आणि कॉटन फेडरेशनचे किती खरेदी केंद्र आहेत. तसेच सोयाबीनचे खरेदी किती केंद्रावर केली जाते. आतापर्यंत जिल्ह्यात किती शेतक-यांची नोंदणी झाली आदी बाबींची माहिती घेतली.
जिल्ह्यात सीसीआयचे राळेगाव, खैरी, माळवी, मारेगाव, मुकुटबन, पांढरकवडा, शिंदोला, वाढोणाबाजार आणि वणी येथे खरेदी केंद्र आहे. तसेच मूग, उडीद आणि सोयाबीन मिळून आतापर्यंत 2 हजार 473 शेतक-यांची नोंदणी झाल्याचे बैठकीत सांगण्यात आले. यावेळी जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव उपस्थित होते.
                                                  0000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी