वल्लभभाई पटेल व इंदिरा गांधी यांना अभिवादन

यवतमाळ, दि. 31 : देशाचे माजी गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात सरदार पटेल आणि इंदिरा गांधी यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सरदार पटेल आणि आणि इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण केले.
यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, उपजिल्हाधिकारी चंद्रकांत जाजू, संदीप महाजन, नियोजन अधिकारी राठोड, राष्ट्रीय सुचना केंद्राचे (एनआयसी) राजेश देवते उपस्थित होते. यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख म्हणाले, सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती राष्ट्रीय एकता दिन आणि इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी राष्ट्रीय संकल्प दिन म्हणून पाळण्यात येते. सरदार पटेल यांच्यामुळे आपला देश अखंड आणि वेगळ्या स्वरुपात जगासमोर आला. त्यांच्या कार्यशैलीतून नेहमी एकात्मतेचा संदेश देण्यात आला. आज ही एकता व अखंडता अबाधित राखण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करणे गरजेचे आहे. तर इंदिरा गांधी यांनी देशाला एक कणखर नेतृत्व दिले, असे त्यांनी सांगितले.
यावेळी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील विविध विभागाच्या अधिकारी आणि कर्मचा-यांनी सरदार पटेल आणि इंदिरा गांधी यांना अभिवादन केले.
                                                            0000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी