“एकता दौड” मधून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश

पालकमंत्र्यांनी दिली एकता दिनाची शपथ
यवतमाळ, दि. 31 : सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिवस आणि इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रीय संकल्प दिनाचे आयोजन जिल्हा प्रशासनाच्या वतीने आज करण्यात आले. या दोन्ही दिवसानिमित्त समता मैदान येथून एकता दौडकाढण्यात आली. यावेळी दौडमध्ये सहभागी विद्यार्थी आणि  नागरिकांनी राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला.
पालकमंत्री मदन येरावार यांनी मशाल व हिरवी झेंडी दाखवून एकता दौडचा शुभारंभ केला. तत्पूर्वी त्यांनी उपस्थितांना एकता दिनाची शपथ दिली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पोलिस अधिक्षक एम. राजकुमार, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, उपजिल्हाधिकारी चंद्रकांत जाजू, पोलिस उपअधिक्षक (गृह) सेवानंद तामगाडगे, तहसीलदार सचिन शेजाळ, उपविभागीय पोलिस अधिकारी पी.व्ही. जगताप, शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी, जिल्हा क्रीडा अधिकारी प्रदीप शेटीये, राजू डांगे आदी उपस्थित होते.
सदर एकता दौड समता मैदान येथून तिरंगा चौक, पाचकंदील चौक, शहर पोलिस स्टेशन, बस स्टँड, एलआयसी चौक मार्गे गेल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय येथे समारोप करण्यात आला. यावेळी राणी लक्ष्मीबाई विद्यालय, अँग्लो हिंदी विद्यालय, शिवाजी हायस्कूल, साई विद्यालय, अंजूमन उर्दु हायस्कूल, नाथार इंग्लीश हायस्कूल, लोकनायक अणे विद्यालयातील विद्यार्थी, जिल्हा प्रशिक्षण केंद्रातील खेळाडू, पोलिस दलातील अधिकारी-कर्मचारी, स्काऊट-गाईड कार्यालय, नगर पालिकेतील कर्मचारी तसेच विविध सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी आणि नागरिकांनी या दौडमध्ये सहभाग नोंदविला.
                                                      0000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी