जिल्हाधिका-यांनी घेतली वैद्यकीय महाविद्यालयात आढावा बैठक

यवतमाळ, दि. 12 : जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आरोग्याबाबत आढावा बैठक घेतली. यावेळी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मनिष श्रीगिरवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. टी.जी.धोटे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.डी.जी. चव्हाण, मेडीसीन विभागाचे डॉ. बाबा येलके उपस्थित होते.
किटकनाशक फवारणीमुळे विषबाधा झालेल्या रुग्णांच्या प्रकृतीबाबत चौकशी करून जिल्हाधिकारी डॉ. देशमुख म्हणाले, औषधीचा पुरवठा रुग्णांना झाला पाहिजे. बाह्यरुग्ण विभागात डॉक्टरांनी वेळेवर उपस्थित राहावे. वैद्यकीय महाविद्यालयाला निधी देण्यात आला आहे. त्यातून औषधसाठा, उपकरणे आदी अद्ययावत ठेवा. परिसरात असलेल्या खाजगी बेकायदेशीर रुग्णवाहिकांचा बंदोबस्त करा, अशा सुचना त्यांनी केल्या.
यावेळी वैद्यकीय महाविद्यालयातील सर्व विभागाचे डॉक्टर्स आणि प्राध्यापक उपस्थित होते.

                                                      00000000

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

अमली पदार्थापासून व्यसनमुक्तीकडे …

घरकुल लाभार्थ्यांशी मुख्यमंत्र्यांचा संवाद