भारी गावात जिल्हाधिका-यांनी केली शिवार फेरी

सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा

यवतमाळ, दि. 10 : पाणी फाउंडेशनच्यावतीने आयोजित सत्यमेव जयते वॉटर कप 2018 मध्ये भारी गावाने सहभाग नोंदविला आहे. या अंतर्गत गावातील पाच नागरिकांनी प्रशिक्षण पूर्ण केले. गावाने स्पर्धेपूर्वी करावयाच्या कामास सुरूवात केली आहे. या कामाची पाहणी व नियोजनाकरीता शिवारफेरी काढून जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख गावात पोहचले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, तहसीलदार सचिन शेजाळ, सरपंच गणपत गाडेकर, उपसरपंच शिलानंद कांबळे, पाणी फाउंडेशनचे जिल्हा समन्वयक संतोष गवळे, अशोक बगाडे  आदी उपस्थित होते.
जिल्हाधिका-यांनी गावक-यांना सोबत घेऊन प्रत्यक्ष शिवाराची पाहणी केली. जलसंधारणाकरीता माथा ते पायथा उपचार किती महत्वाचे हे सांगताना  अनघड दगडी बांध, गेबियन बंधारा, पाझर तलाव, शेततळे कुठे घ्यावे, याबाबत प्रशिक्षणार्थी व गावक-यांसोबत चर्चा केली. सर्व उपचार हे शास्त्रधारीत असावे, याकरीता स्वतः जिल्हाधिकारी यांनी त्या-त्या ठिकाणी जाऊन उपचाराची स्थळ निश्चिती केली.  सोबतच गावात     होणा-या शोषखड्ड्यांची पाहणी करत हे खड्डे गुणवत्तापूर्वक होण्याकरीता सूचना दिल्या.  शाळकरी मुलांच्या सहकार्याने बनविलेली रोपवाटिकेचा आदर्श इतर गावांनीसुद्धा घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी तालुका समन्वयक अश्विनी दवारे, प्रफुल्ल कोहाड, मंगेश धुरबडे, विनय उईके, रुपेश माहुरले, प्रथमेश क्षीरसागर, उषा उकड यांच्यासह तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक तसेच गावकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
00000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी