पालकमंत्र्यांची आसोला येथे भेट


यवतमाळ, दि. 11 : किडनी आजारामुळे प्रकाशझोतात आलेल्या यवतमाळ तालुक्यातील आसोला या गावाला पालकमंत्री मदन येरावार यांनी आज (दि.11) भेट देऊन वस्तुस्थिती जाणून घेतली. यावेळी जि.प. उपाध्यक्ष श्याम जयस्वाल, मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दुर्योधन चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. टी.जी. धोटे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्र्यांनी किडनी आजार नेमका कशामुळे झाला, याची विचारणा करून पाण्याचे नमुने, नागरिकांच्या रक्तगटाची चाचणी आदी तपासण्याचे आदेश दिले. नेमका आजार कशाने झाला हे तांत्रिकदृष्टया शोधणे गरजेचे आहे. नागरिकांमध्ये असलेली भीती घालविण्यासाठी शासकीय यंत्रणा तसेच लोकप्रतिनिधींनी जनजागृती करावी. पाण्याच्या स्त्रोतांमध्ये काही समस्या असेल तर त्यात तात्काळ सुधारणा करा. किराणा दुकानातून छोट्या-मोठ्या आजारासाठी औषधी घेतली जाते, असे निदर्शनास आणून देताच औषधी व अन्न प्रशासन विभागाने याबाबत तात्काळ तपासणी करावी. ज्या किराणा दुकानातून औषधी विकली जात असेल अशा दुकानांवर कारवाई करून ते सील करावे, असे आदेश त्यांनी संबंधित यंत्रणेला दिले. गाव आजारमुक्त करण्यासाठी योगा व इतर सामाजिक उपक्रम राबविणे गरजेचे आहे. सरकारच्या आरोग्याच्या योजना नागरिकांपर्यंत पोहचवा. ग्रामसेवक, तलाठी, सरपंच, कृषी सहायक आणि नागरिकांनी आरोग्याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करावी, अशा सुचना त्यांनी केल्या.
यावेळी पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता आडे, संबंधित विभागाचे कर्मचारी आणि गावकरी उपस्थित होते.
00000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी