बाल कल्याण समितीने स्विकारला पदभार

यवतमाळ, दि 14 जून, (जिमाका) :- काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या बालकांसाठी जिल्ह्यात नवीन बाल कल्याण समितीने दिनांक 07 जून 2022 रोजी पदभार स्वीकारला असून शासकीय निरीक्षण गृह बालगृह (मुलांचे ) सिद्धेश्वर भवन चापमनवाडी यवतमाळ येथे समिती कार्यान्वित झाली आहे. सदर समितीमध्ये अध्यक्ष म्हणून वासुदेव पुंडलिकराव डायरे तर अनिल देविदास गायकवाड, अनिता विठ्ठल शिरफुले, ॲड. लीना मनोहर आदे यांची 3 वर्ष अशासकीय सदस्य म्हणून निवड झाली आहे. सदर समिती 18 वर्षाआतील सर्व बालकांच्या अडचणी सोडविणे, बालकांची काळजी घेणाऱ्या नोंदणीकृत संस्थेत बालकांना दाखल करणे, त्यांचे पुनर्वसन करणे, संस्थांना भेटी देऊन तपासणी इत्यादी महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडेल. समितीच्या कार्याचा भाग म्हणून अशा शासकीय निरीक्षण बालगृह (मुलांचे) यवतमाळ येथे समिती अध्यक्षांसह, सर्व सदस्यांनी भेट देऊन तपासणी केली, तपासणी वेळी बालकांची प्रत्यक्ष चर्चा करून त्यांना पुरविण्यात येणाऱ्या सोयी सुविधा, त्यांची शालेय स्थिती, त्यांच्या अडी-अडचणी, त्यांच्या आवडीनिवडी, संस्थेतील भौतिक सोयी-सुविधा, कर्मचारी वर्ग इत्यादी बाबत चर्चा करण्यात आली. संस्थेचे कामकाजाचे स्वरूप इ.बाबी समजून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. संस्थेची नियमित साफसफाई ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या व बालकांना अडचणीच्या वेळी अथवा काही समस्या उद्भभवल्यास, जिल्ह्यातील अडचणीत सापडलेले बालक, त्यांचे पालक, पोलिस यंत्रणा, स्वयंसेवी संस्था यांनी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. भेटीच्या वेळी संस्थेचे अध्यक्ष गजानन जुमळे, इतर कर्मचारी वर्ग उपस्थित होते .

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी