रक्तदानातून करा रूग्णसेवा

जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे आवाहन 14 जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात महारक्तदान शिबीर यवतमाळ, दि 13 जून, (जिमाका) :- शासकीय रूग्णालय व विविध वैद्यकीय संस्थांमध्ये सध्या रक्ताचा तुटवडा जाणवत असून गंभीर रूग्णांना वेळोवेळी रक्ताची गरज लागत असते. आपण केलेल्या रक्तदानातून एखाद्या रूग्णाचे प्राण वाचू शकतात म्हणूनच रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान समजले जाते. तेव्हा आपणही रक्तदान करून रूग्णसेवेत मदत करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सर्व नागरिकांना केले आहे. जागतीक रक्तदाता दिवसानिमित्त 14 जून रोजी जिल्हा प्रशासनातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयातील बळीराज चेतना भवन (बचत भवन) येथे सकाळी 8 वाजेपासून महारक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीरात इच्छुक नागरिक व संस्थांनी रक्तदान करण्यासाठी सहभाग नोंदविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी