खते व बियाण्यांची कृत्रीम टंचाई निर्माण केल्यास फौजदारी कारवाई करा - जिल्हाधिकारी अमोल येडगे

Ø बीजप्रक्रीया व अमरपट्टा पेरणीचे प्रात्याक्षीके शेतकऱ्यांच्या बांधावर घ्या Ø जिल्ह्यात खते व बियाण्यांचा पुरेसा साठा उपलब्ध Ø कृषी निविष्ठाच्या तक्रारी 9403961157या क्रमांकावर नोंदवा Ø बियाणे खरेदीची पावती जपून ठेवा यवतमाळ, दि 17 जून, (जिमाका) :- जिल्ह्यात खते व बियाण्यांचा पुरेसा साठा उपलब्ध असून त्याची कृत्रीम टंचाई निर्माण होणार नाही तसेच शेतकऱ्यांना चुकीचे बियाणे देवून कोणी फसवणूक करणार नाही, यासाठी कृषी विभागाने दक्ष राहावे व जाणूनबुजून टंचाई निर्माण करणाऱ्यांवर तात्काळ फौजदारी कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आमले येडगे यांनी कृषी विभागाला दिले. जिल्हास्तरीय कृषी निविष्ठा सनियंत्रण समितीची सभा जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आज घेण्यात आली. याप्रसंगी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळकपर, जिल्हा कृषी विकास अधिकारी राजेंद्र माळोदे, गुवणवत्ता नियंत्रण अधिकारी शिवा जाधव, सर्व उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी तसेच खते व बियाणे कंपण्याचे प्रतिनिधी प्रामुख्याने उपस्थित होते. कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जावून बीजप्रक्रीया व कमी खर्चात जास्त उत्पादन देणाऱ्या अमरपट्टा पेरणी चे प्रात्याक्षीके घेवून शेतकऱ्यांना त्याची माहिती देण्याचे तसेच त्यांना जैविक खतांचा वापर करण्यासाठी प्रोत्साहित करण्याबाबतही जिल्हाधिकारी येडगे यांनी सूचना दिल्या. उगवण क्षमता नसलेले बियाणे आढळल्यास संबंधीतांकडून नुकसाण भरपाई मिळविण्यासाठी बीयाणे खरेदीच्या पावती उपयुक्त ठरेल, त्यामुळे शेतकऱ्यांनी बियाणे खरेदीची पावती जपून ठेवण्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण कृषी निविष्ठा उपलब्ध होण्या करीता तसेच कृषी निविष्ठेच्या गुणवत्तेबाबतच्या तक्रारी जशा की जादा दराने विक्री करणे, मुदत बाह्य कृषी निविष्ठांची विक्री करणे, साठेबाजी करणे व अनधिकृत कृषी निविष्ठा व बियाण्यांची विक्री करणे अशा प्रकारच्या तक्रारी जिल्हा नियंत्रण कक्षाच्या 9403961157 या क्रमांकावर शेतकऱ्यांनी नोंदवाव्या. कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांच्या तक्रारीचे निवारण करण्यात येईल. नियंत्रण कक्षाचा हा नंबर कृषी विभागाने सर्वांपर्यंत पोहचवावा, असेही जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी बैठकीत सांगितले. बैठकीला कृषी विभागाचे अधिकारी तसेच खत व बियाणे कंपण्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी