गेल्या 24 तासात सहा कोरोना पॉझिटिव्ह

यवतमाळ, दि 21 जून, (जिमाका) :- गेल्या 24 तासात यवतमाळ जिल्ह्यातील सहाजण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहे. यात दारव्हा तालुक्यातील एक, दिग्रस दोन, यवतमाळ एक व इतर शहरातील दोन रूग्णांचा समावेश असून त्यापैकी चार महिला व दोन पुरूष आहे. जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज एकूण 442 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी सहा अहवाल पॉझिटिव्ह असल्याने उर्वरित 436 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 79086 आहे तर बरे झालेल्यांची एकूण संख्या 77269 आहे. ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या जिल्ह्यात 11 व बाहेर जिल्ह्यात तीन अशी एकूण 14 झाली आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण 1803 मृत्यूची नोंद आहे. जिल्ह्यात आतापर्यंत आठ लाख 77 हजार 798 चाचण्या झाल्या असून त्यापैकी सात लाख 98 हजार 712 निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 9.01 असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी दर 1.36 आहे तर मृत्यूदर 2.28 आहे. नागरिकांनी कोरोना त्रीसुत्री नियमांचे पालन करावे, तसेच कोरोनाचा पहिला, दुसरा व तीसरा डोज घेवून पुर्ण लसीकरण करावे व स्वत:ला सुरक्षीत करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे. 0000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी