वनहक्क व पेसा केंद्राचे वतीने जागतिक पर्यावरण दिन साजरा

यवतमाळ, दि 7 जून, :- आदिवासी प्रशिक्षण व संशोधन संस्था, पुणे द्वारा युनिसेफ संचालित वनहक्क व पेसा चे सूक्ष्म नियोजन आणि संसाधन व्यवस्थापन केंद्र, यवतमाळ यांच्यावतीने पर्यावरण दिन हा वृक्षारोपण करून साजरा करण्यात आला. यवतमाळ येथील स्वप्नपूर्ती नगर या ठिकाणी युनिसेक चे अधिकारी व स्थानिक नागरिक यांचे उपस्थितीत वन्य प्रजातीचे वृक्षारोपण करण्यात आले. जागतिक तापमान वाढीमुळे, पूर अवर्षण, दुष्काळ यासारख्या नैसर्गिक संकटांना मानवाने स्वतः आमंत्रण दिले आहे. अशा वेळी या सर्व संकटापासून मानवाला स्वतःला वाचायचे असेल तर त्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे, असे मत वन हक्क व पेसा संसाधन केंद्राचे समन्वयक शेख रसूल यांनी यावेळी व्यक्त केले. जागतिक स्तरावर यावर्षी ‘केवळ एक पृथ्वी” या संकल्पनेवर आधारित विविध पर्यावरण पूरक कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे. यावेळी पिंपळ ,वड, आंबा यांसारख्या वन्य प्रजाती वृक्षांचे रोपण करण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी पर्यावरण संवर्धनाची प्रतिज्ञा घेवून पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन आकाश राऊत यांनी केले तर आभार प्रदर्शन अरविंद बोरकर यांनी केले. कार्यक्रमाला संसाधन केंद्राचे समन्वयक रसूल शेख, तीतिक्षा डंभे, आकाश राऊत, सुमित भालेराव, ॲड. वैभव पंडित, अमोल मेश्राम, सैयद मोहसीन, डेव्हिड शिवणकर, बाबाराव आत्राम, आकाश टेकाम तर स्वप्नपुर्ती नगरातील निलध्वज कांबळे, अनिल वासनिक, सुमेध ठमके, प्रा. नगराळे, प्रा.थुल, अरविंद बोरकर, रूपाली कांबळे, सुनील घोडदौड, माधुरी ठमके, कल्पना गजभिये, रिया मेश्राम, प्रा. श्रद्धा धवणे, सुनीता थुल आदी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी