एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कुल प्रवेश परिक्षा 5 जून रोजी

 

               यवतमाळ, दि 31 मे, (जिमाका) :- प्रकल्प अधिकारी,एकात्मिक अदिवासी विकास प्रकल्प, पांढरकवडा जिल्हा यवतमाळ अंतर्गत एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कुलमध्ये प्रवेशासाठी सन 2022-23 या शैक्षणिक वर्षात राज्यातील आदिवासी विकास विभाग अंतर्गत इंग्रजी माध्यमांच्या सर्व एकलव्य मॉडेल रेसीडेंशियल स्कुल मधील इयता 6 वी च्या वर्गात नियमित प्रवेश तसेच इयता 7 ते 9 वी च्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या  रिक्त जागा भरणेकरीता एकात्मिक आदिवासी  विकास प्रकल्प पांढरकवडा यांचे कार्यक्षेत्रात येणाऱ्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या अनुसूचि जमातीच्या विद्यार्थ्यांची मॉडेल एकलव्य रेसिडेंशियल स्कुल प्रवेशपुर्व परीक्षा दिनांक 5 जून 2022 रोजी घेण्यात येणार आहे.

सदर परीक्षा केळापूर, झरी, कळंब, मारेगाव, वणी या तालुक्याकरीता अंतरगाव ता. कळंब जिल्हा यवतमाळ व घाटंजी, यवतमाळ, बाभूळगाव, दारव्हा, आर्णी  या तालुक्याकरीता चिचघाट ता.जि.यवतमाळ येथे दिनांक 5 जून 2022 प्रवेशपूर्व परीक्षा घेण्यात येणार आहे. सदर परीक्षेकारीता अर्ज सादर केलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी त्यांच्या तालुक्याकरीता दिलेल्या परीक्षा केंद्रावर आपल्या पाल्यांना सकाळी 9.45 पर्यंत हजर करावे. तसेच काही अडचण असल्यास  फोन क्रंमाकावर 07235-227436 संपर्क करावा असे एकात्मिक आदिवासी ‍ विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी विवेक जॉनसन यांनी कळविले आहे.  

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी