जिल्ह्यात राबविणार "गांव तेथे स्मशानभुमी शेड" उपक्रम

यवतमाळ, दि 10 जून, (जिमाका) :- यवतमाळ जिल्ह्यामध्ये पालकमंत्री संदिपान भुमरे यांचे मार्गदर्शनातुन तसेच जिल्हाधिकारी अमोल येडगे व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांचे संकल्पनेतुन "गांव तेथे स्मशानभुमी शेड" हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येणार आहे. हा उपक्रम जिल्हा वार्षीक योजनेअंतर्गत सन २०२२-२३ करिता राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने एकुण ४५७ गावांमध्ये स्मशानभुमी शेड बांधकाम व इतर सुविधा उपलब्ध करून देण्यास मंजुरी मिळण्याबाबतचा प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांचे शिफारशीने जिल्हा नियोजन समितीकडे सादर करण्यात आला आहे. जिल्ह्यातील बऱ्याच गावांमध्ये स्मशानभुमी शेड नसल्याने पावसाळ्यामध्ये अंत्यविधी पार पाडतांना गावकऱ्यांना अनेक अडचणीस सामोरे जावे लागत आहे. या बाबत प्राप्त तक्रारींची दखल घेत लोकप्रतिनिधी व ग्रामपंचायतीकडुन प्रस्ताव मागविण्यात येवून त्यावर कार्यवाही करण्यात येत असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी कळविले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी