आदिवासी पारंपारीक नृत्य स्पर्धा

पुसद प्रकल्प कार्यालयाद्वारे 24 जून रोजी आयोजन यवतमाळ, दि 9 जून, (जिमाका) :- आदिवासी संस्कृतीचे जतन करण्याकरीता आदिवासी समाजाच्या पारंपारीक नृत्य कलेला प्रोत्साहन देण्यासाठी आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे मार्फत प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पुसद जि. यवतमाळ कार्यालयाचे स्तरावर आदिवासी पारंपारीक नृत्य स्पर्धा दिनांक 24 जून 2022 रोजी आयोजित करण्यात येणार आहे. प्रकल्प कार्यालयाचे कार्यक्षेत्रातील नेर, दारव्हा, दिग्रस, आर्णी, महागांव, पुसद व उमरखेड या सात तालुक्यातील आदिवासी समाजातील विविध जमातीच्या पारंपारीक नृत्य पथकांनी स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे. स्पर्धेमध्ये सहभाग घेण्याकरीता नृत्य पथकांनी दिनांक 20 जुन 2022 पर्यंत कार्यालयीन वेळेत प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पुसद जि.यवतमाळ यांचे कार्यालयात त्यांचे बँक खाते तपशिलासह प्रस्ताव सादर करावेत. स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या नृत्य पथकांतील कलाकारांना मानधन, येण्या-जाण्याचा प्रवास खर्च, दैनिक भत्ता, पेहराव भत्ता, पारितोषीक इत्यादी देण्यात येणार आहे. सहभागी होणाऱ्या नृत्य पथकाने त्यांच्या प्रस्तावामध्ये नृत्यकला पथकांचे नाव, पत्ता, नृत्य कलापथक प्रमुखाचे नाव भ्रमणध्वनी, जमात नृत्य प्रकाराची थोडक्यात माहिती, तसेच प्रत्येक सदस्यांचे नाव, बँक खाते क्रमांक, आय.एफ.एस.सी. कोड, पासबूकची झेरॉक्स, बँकेचे नाव, मोबाईल नंबर प्रस्तावासोबत जोडावे जेणे करून मानधन, प्रवासखर्च जमा करणे सोईचे होईल. अधिक माहितीसाठी प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय पुसद येथे कार्यालयीन दूरध्वनी क्रं. 07233-249546 वर संपर्क करावा, असे प्रकल्प अधिकारी आत्माराम धाबे यांनी कळविले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी