पारधी बेडा येथे जनजागृती कार्यक्रम संपन्न

 



 बालविवाह, बालकांचे लैंगिक शोषण तसेच मासिक पाळीदरम्यानची स्वच्छता विषयी मार्गदर्शन

 

यवतमाळ (०3 जून) :- कापरा येथील पारधी बेडा दुर्गम भागात वसलेले येथील संपूर्ण कुटुंब पारधी समुदायाचे पूर्वापार चालत आलेल्या साधनातून उपजीविका करत असलेल्या वस्तीवर उमेद अभियान पं. सं.- यवतमाळ द्वारे महिला व बाल विकास विभाग  जिल्हा बाल संरक्षण कक्ष व आशादिप सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हा बाल संरक्षण कक्षच्या, संरक्षण अधिकारी  माधुरी पावडे यांनी गावातील किशोरवयीन बालिका व महिला यांच्या सोबत बालविवाह सामाजिक समस्या, त्याचे दुष्परिणाम व बाल विवाह होऊ नये म्हणून काय करता येईल याबाबत मार्गदर्शन केले. बालकाचे लैंगिक शोषण विषयी अनेक पैलू त्यांनी उलघडले. तसेच मासिक पाळी व स्वच्छता विषयी माहिती त्यांनी दिली. २८ मे रोजी मासिक पाळी स्वच्छता दिन म्हणून साजरा करण्यात करण्यात आला त्यानिमित्याने आदित्य बिरला एज्युकेशन ट्रस्ट- मुंबई  यांच्या सहयोगाने आशादिप सामाजिक संस्था यांनी महिला व किशोरवयीन बालिका यांना सॅनीटरी पॅडचे मोफत वाटप केले.

उमेद अभियानाच्या जिल्हा व्यवस्थापक स्नेहा खडसे यांच्या द्वारे बचत गटाना लेखा नोंद वहीचे वाटप करण्यात आले तसेच बचतीचे महत्व व बचत गटाचे सामर्थ्य याविषयी त्यांनी संवाद साधला. 

सदर कार्यक्रम जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी ज्योती कडू व उमेद अभियानच्या जिल्हा व्यवस्थापक स्नेहा खडसे यांच्या मार्गदर्शनात आयोजित करण्यात आला व या कार्यक्रमाकरीता उमेद अभियानचे शैलेश भैसारे, तालुका व्यवस्थापक प्रशांत चावरे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी देवेंद्र राजूरकर, सामाजिक कार्यकर्त्या वनिता शिरफुले हे उपस्थित होते व त्यांनी महिलांशी व किशोरवयीन बालीकांशी संवाद साधला. यावेळी गावातील बचत गटातील महिला प्रामुख्याने उपस्थित होत्या, आमच्या गावात बालविवाह होऊ देणार नाही असा निर्धार यावेळी महिलांनी केला.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी