21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन

योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी होण्याचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे आवाहन शारिरिक व मानसिक सुदृढतेसाठी नियमित योग करा यवतमाळ, दि 17 जून, (जिमाका) :- आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त दिनांक 21 जून 2022 रोजी यवतमाळ जिल्ह्यात योग दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून सर्व नागरिकांनी योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी व्हावे तसेच शारिरिक व मानसिक सुदृढतेसाठी आपल्या दैनंदिन जीवनात योगाचा समावेश करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे. जिल्हा प्रशासन व विविध सामाजिक संघटनाच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 21 जून रोजी सकाळी 6.30 ते 7.45 दरम्यान जिल्ह्यात योग दिन साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त यवतमाळ शहरातील जिल्हा क्रिडा संकुल येथे तसेच प्रत्येक तालुकास्तरावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी यवतमाळ जिल्ह्यातील विविध शैक्षणिक संस्था, विद्यालय, महाविद्यालय युवक, युवती, विद्यार्थी, नागरीक यांनी सकाळी 6.30 वाजेपासून कार्यक्रमात सहभागी व्हावे, तसेच कार्यक्रमाला येतांना स्वत:चे आसन सोबत आणावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. योग दिनानिमित्त निवासी उपजिल्हाधिकारी ललीतकुमार वऱ्हाडे यांनी कार्यक्रमाच्या आयोजनाचा नुकताच आढावा घेतला. याप्रसंगी जिल्हा क्रिडा अधिकारी नंदा खुरपुडे, केंद्रीय संचार ब्युरो अमरावतीचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी इंद्रवदनसिंह झाला व अंबादास यादव, नेहरू युवा केंद्राचे अनिल ढेंगे, पतंजली योग समिती, रविशंकर आर्ट ऑफ लिव्हींग, क्रीडा भारती, यवतमाळ जिल्हा हौसी असोसिएशन, यवतमाळ जिल्हा शारिरीक शिक्षण संघटना, आरोग्य भारती, संस्कार भारती, जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळ, विविध योग समिती संघटना मंडळ, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तसेच विविध सामाजिक संघटनांच्या व विविध समाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. आठव्या आंतरराष्ट्रीय योगदिनी जास्तीत जास्त संख्येने अबालवृध्द यांनी उपस्थिती दर्शवावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी