डी. एल.एड. प्रथम वर्ष ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु

यवतमाळ, दि 30 जून, (जिमाका) :- शैक्षणिक वर्ष 2022-23 साठीची डी. एल.एड. प्रथम वर्ष प्रवेश पक्रिया ऑनलाईन पध्दतीने 23 जून 2022 पासून सुरु झाली आहे. डी. एल.एड. प्रवेश प्रक्रियेबाबतची प्रवेश नियमावली, अध्यापक विद्यालय यादी, वेळापत्रक, प्रवेशाबाबतच्या सूचना व अर्ज www.maa.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. उमेदवारांनी ऑनलाईन आवेदनपत्र 23 जून ते 8 जुलै 2022 या कालावधीत भरावययाचे असून अर्ज भरतांना विद्यार्थ्यांचे इमेल आयडी व मोबाईल नंबर देणे आवश्यक आहे. ऑनलाइन पडताळणी झाल्यावर त्रुटीसह गुणवत्ता यादी 11 जुलै रोजी तर पुर्ण भरलेल्या अर्जांची गुणवत्ता यादी 13 जुलै रोजी संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येणार आहे. प्रथम फेरी प्रवेशाची यादी 14 जुलै रोजी जाहीर होईल यानुसार उमेदवारांनी 14 ते 18 जुलै या कालावधीत प्रवेश निश्चित करावयाचा आहे. तद्नंतर 19 जुलै रोजी दुसऱ्या फेरीसाठी विकल्प देता येईल. दुसऱ्या फेरीची यादी 21 जुलै व तिसऱ्या फेरीची यादी 28 जुलै रोजी जाहिर करण्यात येणार आहे. दिलेल्या विकल्पाप्रमाणे विद्यार्थ्यांनी डी.एल.एड. साठी आपले प्रवेश निश्चित करावे, असे आवाहन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. प्रशांत काशीनाथ गावंडे यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी