वैद्यकीय उपकरणांची नोंदणी करा

 

अन्न व औषध प्रशासनाचे आवाहन

यवतमाळ, दि 3 जून, (जिमाका) :- केंद्र शासनाने औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा 1940 अंतर्गत वैद्यकीय उपकरणे नियम 2017 पारित केले आहेत. या नियमानुसार रुग्णांच्या उपचारासाठी व रोग निदानासाठी लागणाऱ्या वेगवेगळया वैद्यकीय उपकरणांचे “” “” “”  “” अशीवर्गवारी केली आहे. “”  “” या प्रवर्गातील वैद्यकीय उपकरणांवर राज्याचे नियंत्रण आहे आणि “”  “” या प्रवर्गातील वैद्यकीय उपकरणांवर  केंद्र शासनाचे नियंत्रण आहे.

वैद्यकीय उपकरणांची व्याप्ती व उपलब्धता विचारात घेता केंद्र शासनाच्या दि. 11 फेब्रुवारी 2020 रोजीच्या अधिसूचनेद्वारे जे उत्पादक वैद्यकीय उपकरणांचे उत्पादन करतात त्यांनी त्यांच्या वैद्यकीय उपकरणांबाबत केंद्र शासनाने तयार केलेल्या “सुगम पोर्टल” (www.cdscomdonline.gov.in)   या संगणक प्रणालीवर नोंदणी करण्यासाठी 30 सप्टेंबर 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

तरी राज्यातील सर्व वैद्यकीय उपकरणे उत्पादकांनी ही नोंदणी विहित मुदतीत पूर्ण करावी, असे अन्न व औषध प्रशासनाद्वारे आवाहन करण्यात आले आहे. ज्यांची नोंदणी विहित मुदतीत केली जाणार नाही त्यांच्या विरुध्द औषधे व सौंदर्य प्रसाधने कायद्याअंतर्गत सक्त कारवाई करण्यात येईल असे अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त (औषधे) स.भा.दातीर यांनी कळविले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी