तंत्रज्ञानाचा उपयोग उत्कृष्ट विद्यार्थी घडविण्यासाठी करा

डिजिटल शिक्षक प्रशिक्षण कार्यशाळेत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे आवाहन  डिजिटल एज्युकेशन प्लॅटफॉर्मचा प्रभावी वापर विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी करा  मुलांच्या शिकण्याच्या पातळीत वाढ करण्यासाठी दोन पावले पुढे जाऊन नियोजन करा यवतमाळ, दि 25 जून, (जिमाका) :- शिक्षकांनी डिजिटल एज्युकेशन प्लॅटफॉर्मचा प्रभावी वापर विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी करावा. तंत्रज्ञानाच्या उपयोगातून सर्व विद्यार्यां ना चांगल्या पद्धतीने घडविण्यासाठी येत्या शैक्षणिक वर्षात आपले संपुर्ण योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज शिक्षकांना केले. केंद्रीय शिक्षण मंत्रालय आणि जिल्हाधिकारी, यवतमाळ यांच्या पुढाकाराने सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, यवतमाळ यांनी एज्युफ्रंट टेक्नॉलॉजी आणि आश्रय फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने डिजिटल शिक्षक प्रशिक्षण अभियानाचे आयोजन आज सामाजिक न्याय भवन येथे केले होते. याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त भाऊराव चव्हाण, एज्युफ्रंट टेक्नॉलॉजीचे विपणन अधिकारी अरूण मेहरा प्रामुख्याने उपस्थित होते. जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की राष्ट्रीय संपादणूक चाचणी मध्ये यवतमाळ जिल्हा शैक्षणिक क्षेत्रात कमी कार्यक्षमतेचा जिल्हा म्हणून घोषित झाल्यापासून विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. डिजिटल एज्युकेशन या उपक्रमाचा विद्यार्थ्यांना चांगला फायदा होईल. गणीत, विज्ञान व इंग्रजी या विषयात आपला विद्यार्थी मागे राहणार नाही व या विषयांबाबत विद्यार्थ्यांमध्ये कोणताही न्यूनगंड राहू नये यासाठी शिक्षकांनी अधीक चांगली सेवा देवून उत्कृष्ट विद्यार्थी घडविण्याचा संकल्प करण्याचेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी शिक्षणात कमी कार्यक्षमतेचा जिल्हा ही जिल्ह्याची ओळख या वर्षी पुसून काढण्याचे व दिवाळीपर्यंत मुलांच्या शिकण्याच्या पातळीत वाढ करण्यासाठी दोन पावले पुढे जाऊन नियोजन करण्याचे सांगितले. भाऊराव चव्हाण यांनी प्रास्ताविकेतून एज्युफ्रंट च्या सहाय्याने डिजिटल शिक्षणाद्वारे इयत्ता तीसरी व पाचवी च्या विद्यार्थ्यांसाठी गणीत व इंग्रजी विषयातील कौशल्यवाढ करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे सांगितले. ही प्रशिक्षण मोहीम केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या एका अनोख्या उपक्रमाचा भाग असून याअंतर्गत जिल्ह्यातील पाच शाळांची प्रायोगिक कार्यक्रमासाठी निवड करण्यात आली असल्याचे सांगितले. अरूण मेहरा यांनी डिजिटल शिक्षक प्रशिक्षण उपक्रमाबाबत माहिती दिली. याप्रसंगी 200 हून अधिक शिक्षकांना डिजिटल एज्युकेशन प्लॅटफॉर्मचा प्रभावी वापर करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. तसेच सलग तीन वर्षे 100 टक्के निकाल देणाऱ्या शाळेंचे मुख्याध्यापक व शिक्षकांचा याप्रंसगी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन प्रा. कमल राठोड यांनी केले तर उपस्थितांचे आभार एज्युफ्रंट टेक्नोलॉजी व आश्रय फाऊंडेशनच्या दीपा सिंग यांनी व्यक्त केले. प्रशिक्षणाला जिल्हा समाज कल्याण विभागा अंतर्गत विविध शाळांचे शिक्षक उपस्थित होते. 000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी