शाळेच्या पहिल्या दिवशी जिल्हाधिकारी व सिईओ यांचा विद्यार्थ्यांशी संवाद

Ø पुष्पगुच्छ व चॉकलेट देवून केले विद्यार्थ्यांचे स्वागत Ø विद्यार्थ्यांकडून अक्षरे, अंक, ए,बी,सी,डी, चे वाचन Ø स्वच्छतेबाबत केले मार्गदर्शन Ø पारडी नक्सरी, मेटीखेडा, मारकंड, वाडी-पोड येथील शाळेत भेट यवतमाळ, दि 29 जून, (जिमाका) :- आजपासून नवीन शैक्षणिक सत्राला सुरवात झाल्याने शाळेच्या पहिल्याच दिवशी जिल्हाधिकारी अमोल येडगे व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी चिमुकल्या विद्यार्थ्यांशी शाळेत संवाद साधला व त्यांना पुष्पगुच्छ तसेच चॉकलेट देवून त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) प्रमोद सुर्यवंशी हे देखील उपस्थित होते. जिल्हाधिकारी अमोल येडगे व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पांचाळ यांनी आज कळंब तालुक्यातील पारडी नक्सरी, मेटीखेडा व मारकंड तसेच पांढरकवडा तालुक्यातील वाडी पोड येथील शाळेत भेट देवून विद्यार्थ्यांशी हितगुज केले. त्यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छतेबाबत मार्गदर्शन केले तसेच विद्यार्थ्यांकडून अक्षरे, अंक, ए,बी,सी,डी, चे वाचन करवून घेतले. जिल्हाधिकारी यांनी वर्गखोल्यांची पाहणी केली व शाळेत काय हवे याबाबत विचारणा करून शिक्षक व पालकांशी संवाद साधला. याप्रसंगी एकात्मिक आदिवासी विकास कार्यालयाचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी एम.के.उके तसेच संबंधीत गट शिक्षणाधिकारी, गट विकास अधिकारी, प्राचार्य व शिक्षक उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी