सामाजिक न्यायासाठी धावले यवतमाळ... सामाजिक समतेचा संदेश पुढे न्या - जिल्हाधिकारी

यवतमाळ दि. २६ जून : राजर्षी शाहू महाराज जयंती, सामाजिक न्याय दिन आणि अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त आज जिल्हा प्रशासनाच्या वतीने 'रन फॉर सोशल जस्टिस' चे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ दिलीप पाटील भुजबळ, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे, तीन वर्षीय बालकांसह ८२ वर्षीय माणिक जुनघरे तसेच विविध क्रीडा संघटनांचे प्रतिनिधी, खेळाडू व यवतमाळकर नागरिक आज समता मैदान ते धामणगाव रोड मार्गावर धावले. विशेष म्हणजे जिल्हाधिकारी अमोल येडगे व निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे हे १० कि.मी. तर पोलीस अधीक्षक डॉ दिलीप पाटील भुजबळ हे ५ कि.मी. अंतर धावले. याप्रसंगी जिल्हाधिकारी यांनी राजर्षी शाहू महाराज यांनी दिलेला सामाजिक समतेचा संदेश तसेच अमली पदार्थापासून दूर राहणे व शारीरिक सुदृढता ठेवण्याचा संदेश या रन मधून प्रसारित करण्याचे सांगितले. यावेळी १० कि.मी. धावण्याच्या स्पर्धेत विजेता ठरलेले अजिंक्य गायकवाड, मंगेश कोकांडे, संकेत सिंधनदुधे, रिना मेश्राम, गुंजन खिची, अवंती का वासनीक, ५ कि.मी. मधील ओम देशमुख, प्रणय टिचकुले, चेतन पुरके, प्रिती ढाकरने, किर्ती देऊळकर, गितांजली कोरपते, तर ३ कि.मी. स्पर्धेत कृष्णा राठोड, चंदन पुरके, लकी गवई, मुलींमध्ये गौरी चितळे, नव्या चितळे, गौरी पेंदोर यांना पुरूष व महिला गटात प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पारितोषिक देण्यात आले. प्रा. अनंत पांडे यांनी कार्यक्रमाचे संचालन केले. याप्रसंगी उपविभागीय अधिकारी अनिरुद्ध बक्षी, तहसीलदार कुणाल झाल्टे, गोपाल माहोरे, उल्हास नंदूरकर, सचिंद्र मिलमिले, चैताली राऊत, किशोर चौधरी, फ्लोरासिंग, अनिल मनवर, महेश पडोळे, अरूणा गंधे, सुभाष डोंगरे, अजय मिरकुटे, प्रा. प्रमोद रामपूरकर प्रा. संदिप चावक, प्रदिप मानकर, सागर बारस्कर यांनी स्पर्धेत व स्पर्धा आयोजनात सहभाग नोंदविला.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी