लोकशाही दिनात 142 तक्रारी प्राप्त

यवतमाळ, दि 7 जून, (जिमाका) :- जिल्हास्तरीय लोकशाही दिनात एकूण 142 तक्रारी प्राप्त झाल्या असून प्राप्त झालेल्या तक्रार अर्जावर तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे यांनी लोकशाही दिन प्रसंगी अधिकाऱ्यांना दिल्या. प्रत्येक महिन्यातील पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन केले जाते. त्यानुसार काल जिल्हाधिकारी कार्यालयातील बळीराजा चेतना भवन येथे अपर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे यांच्या अध्यक्षतेखाली लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी ललीतकुमार वऱ्हाडे व विविध विभागप्रमुख व अधिकारी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

घरकुल लाभार्थ्यांशी मुख्यमंत्र्यांचा संवाद

कृषी महोत्सवात शेती विषयक माहितीचे विविध स्टॉल