गेल्या 24 तासात चार पॉझिटिव्ह

यवतमाळ, दि 30 जून, (जिमाका) :- गेल्या 24 तासात यवतमाळ जिल्ह्यातील चार जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले तर 11 जण बरे झाले आहेत. त्यामुळे ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या जिल्ह्यात 46 व बाहेर जिल्ह्यात दोन अशी एकूण 48 झाली आहे. जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज एकूण 419 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 4 अहवाल पॉझिटिव्ह असल्याने उर्वरित 415 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 79154 आहे तर आतापर्यंत बरे झालेल्यांची एकूण संख्या 77303 झाली आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण 1803 मृत्यूची नोंद आहे. जिल्ह्यात आतापर्यंत आठ लाख 82 हजार 136 चाचण्या झाल्या असून त्यापैकी आठ लाख दोन हजार 982 निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 8.97 असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी दर 0.95 आहे तर मृत्यूदर 2.28 आहे. आज पॉझीटीव्ह आलेल्यांमध्ये नेर तालुक्यातील एक, राळेगाव एक व यवतमाळ तालुक्यातील दोन रूग्ण असून त्यात चार पुरूषांचा समावेश आहे. नागरिकांनी कोरोना त्रीसुत्री नियमांचे पालन करावे, तसेच कोरोनाचा पहिला, दुसरा व तीसरा डोज घेवून संपुर्ण लसीकरण करावे व स्वत:ला सुरक्षीत करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी