4 जुलै रोजी लोकशाही दिन

यवतमाळ, दि 29 जून, (जिमाका) :- दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते, त्याअनुषंगाने सोमवार दि. 04 जुलै 2022 रोजी सकाळी 10 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील बळीराजा चेतना भवन (बचत भवन) येथे जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी जिल्हाधिकारी अमोल येडगे जनतेच्या तक्रारी व गाऱ्हाने ऐकूण घेतील व त्यावर पुढील कार्यवाही करण्यात येईल. लोकशाही दिनाला उपस्थित राहणाऱ्या अर्जदारांनी सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक राहील. उपस्थितांनी सॅनिटायझरने हात वारंवार स्वच्छ करणे, सामाजिक अंतर ठेवणे, मास्क घालणे आवश्यक राहील. कोविड प्रतिबंधक उपायोजना केल्यानंतरच नागरिकांना कार्यालयात प्रवेश देण्यात येईल, असे निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे यांनी कळविले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी