शासकीय तंत्रनिकेतनसाठी

प्रवेश प्रक्रियेस प्रारंभ यवतमाळ, दि 10 जून, (जिमाका) :- येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये शैक्षणिक वर्ष २०२२-२३ करिता तंत्रशिक्षण पदविका (पॉलिटेक्निक) अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेला ऑनलाईन पद्धतीने सुरुवात झाली आहे. दहावीनंतरच्या प्रथम वर्ष डिप्लोमा इंजिनिअरिंग (पॉलिटेक्निक) प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून, विद्यार्थ्यांना ३० जून २०२२ पर्यंत नोंदणी करता येणार आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाइन नोंदणी करताना कागदपत्रांच्या छायांकित प्रतीही स्कॅन करून अपलोड कराव्या लागणार आहेत. विद्यार्थ्यांनी प्रवेशाच्या सविस्तर माहितीसाठी http://poly22.dte.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन संस्थेचे प्राचार्य डॉ. आर. पी. मोगरे (9834290464) यांनी केले आहे. प्रवेश प्रक्रियेच्या अधिक माहितीसाठी प्रवेश समन्वयक केशव बेले (9423940081) सहसमन्वयक प्रशांत सब्बनवार (9823664631) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

घरकुल लाभार्थ्यांशी मुख्यमंत्र्यांचा संवाद

कृषी महोत्सवात शेती विषयक माहितीचे विविध स्टॉल