विधी सेवा प्राधिकरणतर्फे "जागतिक सायकल दिवस" साजरा



 

राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय मुंबई यांचे निर्देशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय, यवतमाळ यांचे तर्फे आज 3 जून रोजी  जागतिक सायकल दिवस निमित्य सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले.

सदर रॅलीचे उद्घाटन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष न्या. अनिल सुब्रमण्यम यांनी केले. यावेळी जिल्हा न्यायाधीश-१ जी.जी. भंसाळी, अतिरीक्त सह जिल्हा न्यायाधीश श्री. चव्हाण, दिवाणी न्यायाधीश एल.ए. बिडवई, मुख्य न्यायदंडाधिकारी डि. एस. थोरात, सह दिवाणी न्यायाधीश व्हि. एस. मडके, वकील संघाचे अध्यक्ष अमित बदनोरे, क्रिडा भारती सायकलींग ग्रुपचे अध्यक्ष दिलीप राखे, पत्रकार सेवासंघाचे विजयकुमार बुंदेला तसेच यवतमाळ मुख्यालयातील सर्व न्यायीक अधिकारी, वकील, पॅरा विधी स्वंयसेवक, क्रिडा  भारती सायकलींग ग्रुप, यवतमाळ यांचे पदाधिकारी व कर्मचारी वर्ग यांनी रॅलीत सहभाग नोंदविला.

जिल्हा विधी सेवाचे प्रभारी सचिव न्या, एल.ए. बिडवई यांनी पर्यावरणाचा रास टाळण्यासाठी व आपले आरोग्य चांगले ठेवण्यासाठी सायकल चालविणे खुप गरजेचे असल्याचे यावेळी सांगितले. तर अनंत पांडे, यांनी तणाव मुक्त राहण्यासाठी सायकल चालविण्याबाबत फायदे याबाबतची माहिती दिली.

ही सायकल रॅली जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय, यवतमाळ येथुन स्टेंट बॅक चौक, पुनम चौक ते एल. आय. सी चौक व जिल्हा न्यायालय, यवतमाळ येथे संपन्न झाली. सदर रॅलीचे माध्यमातुन आरोपीचे अधिकार, लोकअदालत व विधी सेवा कायद्याबाबत असलेल्या माहितीचे फलक लावून जनसामान्यामध्ये जनजागृती करण्यात आली.


Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी