आयटीआय मध्ये 27 जून रोजी भरती मेळावा

यवतमाळ, दि 24 जून, (जिमाका) :- सुझुकी मोटर गुजरात करिता शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यवतमाळ येथे 27 जून 2022 रोजी प्रशिक्षणार्थीं रोजगार भरती मेळावा चे आयोजन करण्यात आले आहे. फीटर, डिझेल मेकॅनिक, मोटर मेकॅनिक, टर्नर, मशिनिस्ट, इलेक्ट्रिसियन, ट्रॅक्टर मेकॅनिक, टूल अँड डाई मेकर, प्लास्टिक प्रोसेसिंग ऑपरेटर, सी.ओ.ई. ऑटोमोबाईल, पेंटर जनरल या व्यवसायाकरीता 18 ते 23 या वयोगटातील आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांनी 27 जून रोजी सकाळी 9 वाजता रोजगार मेळाव्यात सहभागी व्हावे. भरती मेळाव्यासाठी उपस्थित प्रशिक्षणार्थींची लेखी परीक्षा कंपनी तर्फे घेण्यात येणार आहे व उत्तीर्ण उमेदवारांनी दिनांक 28 जून रोजी आय.टी.आय. पुलगाव येथे प्रत्यक्ष मुलाखती करीता उपस्थित राहावे. मुलाखतीसाठी दहावी, बारावी पास गुणपत्रिका, बोर्ड सर्टिफिकेट, शाळा सोडल्याचा दाखला, प्रत्येक सेमिस्टर चे आय.टी.आय मार्कशीट, आधार कार्ड, पॅन कार्ड या सर्व आवश्यक कागदपत्राच्या तीन झेरॉक्स प्रती तसेच पाच छायाचित्रे सोबत आणावे. रोजगार मिळण्यासाठी प्राप्त झालेल्या या सुवर्ण संधीचा लाभ घेण्याचे आवाहन औद्योगिक प्रशिक्षण संस्था प्राचार्य प्रमोद भंडारे यवतमाळ यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

घरकुल लाभार्थ्यांशी मुख्यमंत्र्यांचा संवाद

कृषी महोत्सवात शेती विषयक माहितीचे विविध स्टॉल