‘योगाभ्यास’ दैनंदिन जीवनाचा एक भाग बनवा - जिल्हाधिकारी अमोल येडगे

यवतमाळ, दि 21 जून, (जिमाका) :- रोज योग केल्यास आपले शारीरीक व मानसिक आरोग्य चांगले राहून आपली कार्यक्षमता वाढण्यास नक्कीच फायदा होतो. त्यामुळे शारीरीक व्यायामासाठी रोज 15 ते 20 मिनीटे वेळ काढून योगाचा अभ्यास वर्षभर करावा व योगाला आपल्या दैनंदिन जीवनाचा एक भाग बनवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आठव्या योग दिन कार्यक्रमानिमित्त केले. माहिती व प्रसारण मंत्रालयाचे केंद्रिय संचार ब्युरो कार्यालय, जिल्हा प्रशासन व विविध सामाजिक संघटनाच्या संयुक्त विद्यमाने आज जिल्हा क्रिडा संकुल येथे आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्यासह जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, निवासी उपजिल्हाधिकारी ललीतकुमार वऱ्हाडे, केंद्रीय संचार ब्युरो अमरावतीचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी इंद्रवदनसिंह झाला, सहायक प्रचार अधिकारी अंबादास यादव, जिल्हा क्रिडा अधिकारी नंदा खुरपुडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पी.एस.चव्हाण व विविध योग संघटनांचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ व जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी देखील उपस्थितांना आठव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या. निवासी उपजिल्हाधिकारी ललीतकुमार वऱ्हाडे यांनी प्रास्ताविकेतून योगदिनाची माहिती दिली. कार्यक्रमाचे संचालन क्षेत्रीय प्रचार कार्यालयाचे सहायक अधिकारी अंबादास यादव यांनी केले. तर उपस्थितांचे आभार क्षेत्रीय प्रचार अधिकारी इंद्रवदनसिंह झाला यांनी व्यक्त केले. याप्रसंगी नेहरू युवा केंद्राचे अनिल ढेंगे, नगरपरिदेचे डॉ. विजय अग्रवाल, जिल्हा क्रीडा कार्यालयाचे सचिन मिलमिले, चैताली राऊत, महेश पडोळे, योग संस्थेचे समन्वयक राजु पड़गीलवार, आर्ट ऑफ़ लिविंग चे शंतनु शेटे, दादा सूरजसे, जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडलचे महेश जोशी, मनीष गुबे, पंतजली चे संजय चाफले, माया चव्हाण, योग नृत्य परिवारचे कमल बगड़ी, गणेश गुप्ता, राजेश नागौरवाला तसेच क्रीडा भारती, यवतमाळ जिल्हा हौसी असोसिएशन, आरोग्य भारती, संस्कार भारती व विविध योग समिती संघटना मंडळ तसेच विविध संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. 000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी