17 हजार 725 लाभार्थ्यांना 191 कोटी 55 लाख कर्ज वाटप

बँक क्रेडीट ऑऊटरिच मोहिमेतून जास्तीत जास्त कर्ज वाटप करा - जिल्हाधिकारी अमोल येडगे -
Ø पीक कर्ज व कृषी उद्योगांना कर्जाचे प्रमाण वाढवा Ø सोप्या पद्धतीने कर्ज पुरवठा करावा Ø अर्थव्यवस्थेसाठी कर्ज हा महत्वाचा घटक यवतमाळ, दि 8 जून, (जिमाका) :- बँक व्यवसाय तसेच अर्थव्यवस्थेच्या सुदृढतेसाठी कर्ज हा महत्वाचा घटक असून बँक क्रेडीट ऑउटरिच मोहिमेच्या माध्यमातून बँकानी जास्तीत जास्त कर्ज वाटप करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत 6 ते 12 जून या कालावधीत बँक क्रेडिट आऊटरिच मोहिम राबविण्यात येत आहे. याअंतर्गत 17 हजार 725 लाभार्थ्यांना 191 कोटी 55 लाख रुपये कर्ज मंजूर करण्यात आले असून लाभार्थ्याना कर्ज वाटपाचे धनादेश व मंजूरी आदेश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे देण्यात आले. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके, बँक ऑफ महाराष्ट्रचे आंचलीक प्रबंधक संजिव कलवले, क्षेत्रीय प्रबंधक मृत्यूंजय पांडा (स्टेट बँक), बी.पी.सामंत (विदर्भ कोकण ग्रामीण बँक), जिल्हा लीड बँकेचे व्यवस्थापक अमर गजभिये, नाबार्डचे जिल्हा प्रबंधक दीपक पेंदाम, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर प्रामुख्याने उपस्थित होते. बँक क्रेडिट आउटरिच कार्यक्रमाच्या माध्यमातून पीक कर्ज, कृषी आधारित उद्योगांना कर्ज व शैक्षणिक कर्जाचे तसेच महिला बचत गटांना कर्जाचे वाटप मोठ्या प्रमाणात करण्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. सर्व बॅकर्सने लाभार्थ्यांशी चागले वर्तन करावे, क्षुल्लक अडचणीसाठी वेळ न घालवता छोट्या-छोट्या गोष्टी तत्परतेने निकाली काढून शेतकऱ्यांना विनाअडथळा व सोप्या पद्धतीने कर्ज पुरवठा करावा. कर्जासाठीच्या अर्ज मंजूरीचा कालावधी कमी ठेवून लवकरात लवकर कर्ज मंजूर करावे. कर्ज मंजूरीसाठीचा वेळ वाचल्याने बँक व लाभार्थी यांना प्रत्येक्ष तर अर्थव्यवस्थेला अप्रत्यक्षरित्या याचा फायदा होईल, असेही त्यांनी सांगितले. जिल्ह्यात सध्या पीक कर्ज वाटप 66 टक्के पुर्ण झाले आहे, हे प्रमाण महिना अखेरपर्यंत 90 टक्के पुर्ण करावे. महिला बचत गटांना कर्ज वाटप, प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिीया उद्योग, प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, किसान क्रेडिट कार्ड, पशुसंवर्धन योजना, बचत गटाचे क्रेडिट लींकेजचे आदि शासनाच्या प्रमुख योजनांमध्ये लाभार्थ्यांना सकारत्मकतेने कर्ज वितरणाचे काम करण्याचे जिल्हाधिकारी यांनी बँकर्सना आवाहन केले. याप्रसंगी कर्ज वितरणात चांगले काम केलेल्या बँक प्रतिनिधींचा जिल्हाधिकारी व मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला आरसेटी संचालक विजयकुमार भगत, माविमचे रंजन वानखडे, उमेदचे निरज नखाते, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे आर. सिद्दीकी, एचडीएफसीचे पवन ठाकरे, सतिष गजघाटे, अमोल अलकरी, सलीम खान, प्रशांत निमकर, प्रविण देवतळे, देवानंद बरडे, संतोष भगत व जिल्ह्यातील बँकेचे वरिष्ठ अधिकारी व आऊटरिच मोहिमेंतर्गत विविध योजनांचे लाभार्थी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी